के.शंकरनारायणन यांचा राजीनामा

By Admin | Published: August 24, 2014 03:53 PM2014-08-24T15:53:23+5:302014-08-24T19:04:13+5:30

महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन थेट मिझोरामच्या राज्यपालपदावर बदली झाल्याने नाराज असलेले के.शंकरनारायणन यांनी रविवारी दुपारी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.

K. Shankaranarayanan resigns | के.शंकरनारायणन यांचा राजीनामा

के.शंकरनारायणन यांचा राजीनामा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन थेट मिझोरामच्या राज्यपालपदावर बदली झाल्याने नाराज असलेले के.शंकरनारायणन यांनी रविवारी दुपारी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. मिझोरामला जाण्यास नकार देत के. शंकरनारायण यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 
मोदी सरकारने शनिवारी रात्री उशीरा महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकरनारायणन यांची मिझोरामच्या राज्यपालपदी तडकाफडकी बदली होती. जूनमध्ये केंद्रात सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारने यूपीएच्या कार्यकाळात नेमलेल्या राज्यपालांना हटवण्याची मोहीमच सुरु केली आहे. के. शंकरनारायणन यांनी मोदी सरकारचा दबाव झुगारुन राष्ट्रपतींनी सांगितल्यास राजीनामा देऊ असे भूमिका घेतली होती. यानंतर मोदी सरकरने शंकरनारायणन यांना थेट मिझोरामच्या राज्यपालपदी पाठवून दिले. 
मिझोरामला बदली केल्याने शंकरनारायणन नाराज होते. 'असा अपमान सहन करण्याऐवजी घरी बसणेच पसंत करीन, बदलीचे वृत्त खरे ठरल्यास मी राज्यपालपदाचा राजीनामा देईन' अशी भूमिका शंकरनारायणन यांनी मांडली होती. यानुसार दुपारी त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. शंकरनारायणन यांच्याऐवजी गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. कोहली यांचा शपथविधी सोमवारी घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली.
 
उद्यापासून काँग्रेसचे काम करणार 
रविवारी संध्याकाळी के. शंकरनारायणन यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली. 'हे सूडाचे राजकारण आहे की नाही हे तुम्हीच ठरवा, सर्वच पक्ष राजकारण करतात. मात्र राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल हे पद राजकारणापासून दूर ठेवायला पाहिजे असे त्यांनी सांगितले. राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यावर उद्यापासून मी सामान्य नागरिक असून काँग्रेससाठी काम सुरु करु अशी घोषणाही त्यांनी केली. 
 

Web Title: K. Shankaranarayanan resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.