मंत्री झालो तर माझा नातू नक्की कारखानेच कारखाने काढेल; राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 01:37 PM2023-12-13T13:37:30+5:302023-12-13T13:37:50+5:30

नीरव मोदीची जागा एमआयडीसीत घेण्यासाठी रोहित पवारांचा आटापिटा; राम शिंदेंचा गंभीर आरोप

If I become a minister, my grandson will surely build factories; Ram Shinde's taunt to Rohit Pawar | मंत्री झालो तर माझा नातू नक्की कारखानेच कारखाने काढेल; राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला

मंत्री झालो तर माझा नातू नक्की कारखानेच कारखाने काढेल; राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला

भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या युवा मोर्चावर टीका केली आहे. नीरव मोदीची कर्जत जामखेडमधील जागा एमआयडीसीमध्ये घेण्यासाठी रोहित पवारांचा हा आटापिटा सुरु असल्याचा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. 

रोहित पवार नीरव मोदीसाठी लढतायत, मी कर्जत जामखेडच्या युवकांसाठी लढतोय. मी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे उद्योग विभागासाठी नीरव मोदीची जमीन एमआयडीसीसाठी घेता येणार नाही, असे उद्योग मंत्र्यांनी जाहीर केले आहे. १५ दिवसांत एमआयडीसीसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे उदय सामंतांनी निर्देश दिलेत, असेही शिंदे म्हणाले.

स्वतःवर फुलांचा वर्षांव करून घेणे, तलावात उड्या मारणे, असा संघर्ष नसतो. अशी संघर्ष यात्रा असते का, असा सवाल शिंदे यांनी केला. त्यांच्या जीवनात कधीच संघर्ष पाहिलेला नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे ते वक्तव्य करतात. मला एमआयडीसी संदर्भामध्ये जे बोलताहेत की तुमचं गुराळ सुद्धा नाही राम शिंदे गुराळ पण काढू शकला नाही. हे अगदी बरोबर आहे, त्यांचा तो आरोप मला मान्य आहे. पण माझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता, चुलता चार वेळा उपमुख्यमंत्री नव्हता. त्यांच्या आजोबांनी देखील एकही कारखाना काढलेला माझ्या ऐकिवात नाही असा टोला शिंदे यांनी लगावला. 

तसेच आता माझी सुरुवात आहे. आता आमदार झालोय मंत्री झालो तर माझा नातू नक्की कारखानेच कारखाने काढेल.  स्वतःच कर्तृत्वावर झिरो केलेले आहे आणि त्यामुळे हे काकाच्या आजोबाच्या सगळ्या मेहरबानीवर झालेले ह्या घटना आहेत. त्यामुळे मी गुराळ काढले नाही पण माझा नातू नक्की काढेल, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. 

Web Title: If I become a minister, my grandson will surely build factories; Ram Shinde's taunt to Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.