मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात भीषण आग

By Admin | Published: February 14, 2016 08:37 PM2016-02-14T20:37:34+5:302016-02-14T21:17:41+5:30

गिरगाव चौपाटीवर सुरु असलेल्य मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात भीषण आग लागली आहे. 'मेक इन महाराष्ट्र' अंतर्गत गिरगाव चौपाटीवर सुरु असलेल्या महाराष्ट्र रजनीच्या सेटवर ही भीषण आग लागली आहे.

Fire in the program of Make in India | मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात भीषण आग

मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात भीषण आग

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - गिरगाव चौपाटीवर सुरु असलेल्य मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात भीषण आग लागली आहे. 'मेक इन महाराष्ट्र' अंतर्गत गिरगाव चौपाटीवर सुरु असलेल्या महाराष्ट्र रजनीच्या सेटवर ही भीषण आग लागली आहे. या आगीत सेट पुर्णपणे जळून खाक झाल्याचे चित्र आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज आहे.
 
आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या १६ गाड्या आणि पाण्याचे ६ टँकर घटणास्थळी पोहचले आहेत. अग्निशामक दलाचे कर्मचारी आग विझवण्या प्रयत्न करत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हाणी झाल्याचे वृत्त नाही.
 
महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सुरु होता, मराठी अभिनेत्री पुजा सांवत लावणी सादर करण्याच्या वेळी हा आग लागला आहे. राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस, शिससेना प्रमुख उद्धव ठाकरे सह या कार्यक्रमात अेनेक मान्यावर उपस्थित होते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अमिर खान, विवेक ओबेरॉय आणि तळपदे ही या कार्याक्रमास उपस्थित होते. 
 
 
मदतकार्य खूप वेगानं झालं. पोलिस आणि अग्निशमन दलाचे आभार, सर्व कलाकार सुरक्षित आहेत. अग्निशामक दलाचे आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत : विवेक ओबेरॉय


आगीने अचानक रौद्र रुप धारण केलं, एकमेकांच्या मदतीने सेटवरुन बाहेर आलो : अभिनेता श्रेयस तळपदे

 

 

Web Title: Fire in the program of Make in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.