बोहल्यावर चढण्याआधीच डॉक्टर चतुर्भुज

By Admin | Published: February 6, 2016 03:45 AM2016-02-06T03:45:34+5:302016-02-06T03:45:34+5:30

लग्नाचे आमिष दाखवून एका सहकारी डॉक्टर युवतीचे दीड वर्षे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी शुक्रवारी एका डॉक्टरला गजाआड केले

Doctor Quadrilateral before climbing | बोहल्यावर चढण्याआधीच डॉक्टर चतुर्भुज

बोहल्यावर चढण्याआधीच डॉक्टर चतुर्भुज

googlenewsNext

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून एका सहकारी डॉक्टर युवतीचे दीड वर्षे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी शुक्रवारी एका डॉक्टरला गजाआड केले. विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारी रोजी या डॉक्टरचे उस्मानाबादेतील एका डॉक्टर तरुणीशी लग्न होणार होते; परंतु बोहल्यावर चढण्याआधीच आता तो चतुर्भुज झाला आहे.
विवेक पाटील (३१, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून त्याच्याविरोधात गुरुवारी मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला होता. याबाबत फौजदार राजकुमार पाडवी यांनी सांगितले की, एक २६ वर्षीय डॉक्टर मुलगी व डॉक्टर विवेक पाटील हे सिडको भागातील एका हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांच्या या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर विवेक याने लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर तिचे लैंगिक शोषण केले.
मात्र गेल्या पाच महिन्यांपासून पीडितेने लग्नाचा तगादा लावल्यावर जातीच्या मुद्यावरून विवेकने नकार दिला. तसेच पोलिसांत गेलीस तर उलट तुझीच बदनामी होईल, अशी भीती तिला दाखविली. पीडितेने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Doctor Quadrilateral before climbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.