तुमच्यात रक्ताचे नाते! विरोध करा पण भाषा जपून वापरा; भुजबळांचा श्रीनिवास पवारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:53 AM2024-03-19T11:53:35+5:302024-03-19T11:54:27+5:30

कोणाची ताकत किती आहे हे मला माहिती नाही. कोणालातरी बरोबर घ्यायचे आहे तर जागा द्याव्या लागतील. - छगन भुजबळ

Blood relationship between you! oppose but use language sparingly; Chagan Bhujbal's warning to Shrinivas Pawar maharashtra Baramati politics, talk on Ajit pawar | तुमच्यात रक्ताचे नाते! विरोध करा पण भाषा जपून वापरा; भुजबळांचा श्रीनिवास पवारांना इशारा

तुमच्यात रक्ताचे नाते! विरोध करा पण भाषा जपून वापरा; भुजबळांचा श्रीनिवास पवारांना इशारा

राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका आहेत त्यामुळे जागावाटप हळूहळू होत आहे. नाशिकची निवडणूक २० मे रोजी आहे, त्यामुळे वेळ आहे. पहिली निवडणूक विदर्भात आहेत बाकी नंतर आहेत. विधानसभा आणि मनपाच्या पण निवडणुका होणार आहेत. राज ठाकरे आल्यामुळे महायुतीची शक्ती वाढेल कमी होणार नाही, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 

कोणाची ताकत किती आहे हे मला माहिती नाही. कोणालातरी बरोबर घ्यायचे आहे तर जागा द्याव्या लागतील. मोदींना परत पंतप्रधान म्हणून पुन्हा बसवायचे आहे. त्यामुळे वरून आदेश आले तर सगळे शांत होतील. 10 वर्षात हेमंत गोडसे यांनी काहीच केले नाही असे भाजप पदाधिकारी म्हणत असतील तर त्यावर नेते बघतील, असे भुजबळ म्हणाले. 

श्रीनिवास पवार यांच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे कुटूंब आहे अस दिसत आहे.  विरोध करा पण भाषा जपून वापरा. राजकारणात विरोधात असले तरी तुमच्यात रक्ताचे नात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात देखील वाद झाले. मात्र त्यांच्यात काही अडचण आल्या तर ते एकमेकांना साठी धावून जातात, असा इशारावजा सल्ला भुजबळ यांनी अजित पवारांच्या बंधुंना दिला आहे. 

तसेच श्रीनिवास पवारांच्या अजित पवारांवरील टीकेला प्रत्यूत्तर देताना जोपर्यंत शिवसेने बरोबर होते तोपर्यंत कोणी काही बोलले नाही. शिवसेनेचा हिंदुत्व चालते मग भाजपचे का नाही? असा सवाल केला. तसेच आम्ही फक्त युती केली आमचा पक्ष वेगळा आहे, असेही भुजबळ म्हणाले.

Web Title: Blood relationship between you! oppose but use language sparingly; Chagan Bhujbal's warning to Shrinivas Pawar maharashtra Baramati politics, talk on Ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.