पवार वि. पवार! नार्वेकर ३१ जानेवारीला, तर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 10:35 AM2024-01-11T10:35:34+5:302024-01-11T10:36:53+5:30

विधानसभा अध्यक्षांनी सेंट्रल हॉलमधून लाईव्ह निकाल जाहीर केला. याद्वारे नार्वेकरांनी लोकांपर्यंत तार्किक आधार ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा निकाल ठाकरे गटाला मान्य नाहीय.

Ajit Pawar Vs. Sharad Pawar! Rahul Narvekar on January 31, the Election Commission will announce the results any moment ncp mla Disqualification | पवार वि. पवार! नार्वेकर ३१ जानेवारीला, तर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल देणार

पवार वि. पवार! नार्वेकर ३१ जानेवारीला, तर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल देणार

महाराष्ट्रातील एका राजकीय नाट्याचा पहिला अंक काल संपला. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सुरु झालेल्या दुसऱ्या राजकीय नाट्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक चिन्ह कोणाचे ते आमदार अपात्रतेवर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल देण्याची शक्यता आहे. तर येत्या ३१ जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना देखील निकाल द्यायचा आहे. शिवसेनेबाबतचा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजुने आल्याने अजित पवार गटाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. 

विधानसभा अध्यक्षांनी सेंट्रल हॉलमधून लाईव्ह निकाल जाहीर केला. याद्वारे नार्वेकरांनी लोकांपर्यंत तार्किक आधार ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा निकाल ठाकरे गटाला मान्य नाहीय, यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. या घडामोडींनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची धाकधुक वाढली आहे. 

निवडणूक आयोगाकडील सुनावणी पूर्ण झाली असून हा निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. ८ डिसेंबरला ही सुनावणी पूर्ण झाली आहे. याला आता महिना होऊन गेला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे. त्यावरून नार्वेकर देखील तसाच निकाल देण्याची शक्यता आहे. 

नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या याचिकांवर सुनावणी घेण्याचे वेळापत्रक ठरविले आहे. यानुसार १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. २० जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी, 20 व 21 जानेवारी अजित पवार गट उलट तपासणी, 22 व 23 जानेवारी शरद पवार गट उलट तपासणी, 3 जानेवारी - शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी व 25 आणि 27 जानेवारी - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद केले जाणार आहेत. यानंतर राहुल नार्वेकर शिवसेनेप्रमाणेच निकाल लिहिण्यासाठी वेळ वाढवून घेण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीला जरी निकाल नाही आला तरी तो १० फेब्रुवारूपर्यंत येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Ajit Pawar Vs. Sharad Pawar! Rahul Narvekar on January 31, the Election Commission will announce the results any moment ncp mla Disqualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.