न्याय मिळवूनही ‘खैरलांजी’त अ‍ॅट्रॉसिटी नसल्याने मूठभरांची टिका : अॅड. उज्ज्वल निकम

By admin | Published: January 14, 2017 04:24 PM2017-01-14T16:24:08+5:302017-01-14T16:24:08+5:30

खैरलांजी हत्याकांड प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली़ यातील आरोपींना फाशी-जन्मठेपेपर्यंत नेले़ तरीही काही मूठभर लोकांनी मला त्यात अ‍ॅट्रॉसिटीचा अंतर्भाव का नाही ?

Even after getting justice, there is no atrocity on Khalarangi; Bright Nikam | न्याय मिळवूनही ‘खैरलांजी’त अ‍ॅट्रॉसिटी नसल्याने मूठभरांची टिका : अॅड. उज्ज्वल निकम

न्याय मिळवूनही ‘खैरलांजी’त अ‍ॅट्रॉसिटी नसल्याने मूठभरांची टिका : अॅड. उज्ज्वल निकम

Next

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 14 -  खैरलांजी हत्याकांड प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली़ यातील आरोपींना फाशी-जन्मठेपेपर्यंत नेले़ तरीही काही मूठभर लोकांनी मला त्यात अ‍ॅट्रॉसिटीचा अंतर्भाव का नाही ? या मुद्यावरुन टीकेचे लक्ष्य केले, अशी खंत विख्यात विधिज्ञ व विशेष सरकारी वकील अ‍ॅड़उज्वल निकम यांनी शनिवारी लातुरात व्यक्त केली़ ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी अ‍ॅड़उज्वल निकम यांच्या हस्ते लातुरात झाले़ यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
 
संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिका डॉ़प्रज्ञा दया पवार होत्या़ तर ज्येष्ट साहित्यिक गंगाधर पानतावणे, डॉ़ जनार्दन वाघमारे, रविचंद्र हडसनकर, जि़ प़ चे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मसापचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य रामचंद्र तिरुके, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, लेखिका संध्या रंगारी यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती़ 
 
पुढे बोलताना अ‍ॅड़ निकम म्हणाले, खैरलांजी प्रकरणात जी अमानुषता दिसली, त्याने जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही, असा विचार मनात आला़ अशाच नाउमेद करणाºया घटना आपल्या आसपास सध्या वाढल्या आहेत़ उपेक्षितांच्या हालअपेष्टांची जाणीव, संवदेना ठेवून साहित्यिकांचे लिखाण झाल्यास हरवत चाललेली उमेद पुन्हा जागेल. समाज बदलण्यासाठी देव जन्म घेणार नाही़ उपास-तपासाने परिवर्तन होणारे नाही़ ते साहित्यातूनच घडेल़ समता, बंधुता व न्याय ही बाबासाहेबांनी सांगितलेली मूल्ये ज्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित होतात, तोच खरा साहित्यिक़ अशा साहित्यातील विचार जगता आले पाहिजे़त तेव्हाच बाबासाहेबांच्या विचारातील राष्ट्र घडेल.  
 
यावेळी बोलताना माजी खासदार डॉ़जनार्दन वाघमारे म्हणाले, संत साहित्याने भक्तीयुग तयार केले आहे़ तर दलित साहित्याने क्रांतीयुग तयार केले़ अशा या साहित्याला प्रेरणा देण्याचे कार्य गंगाधर पानतावणे यांनी ‘अस्मितादर्श’च्या माध्यमातून सातत्याने कले आहे़ राज्यभरातील साहित्यिकांची उपस्थिती लाभलेले हे संमेलन रविवारी रात्रीपर्यंत रंगणार आहे.  विविध विषयांवरील परिसंवाद, कविसंमेलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने हे संमेलन भरगच्च कार्यक्रमांची पर्वणी आहे. 
 
अ‍ॅड. निकमांकडून अ‍ॅट्रासिटीचा विचार व्हायलाच हवा होता : संमेलनाध्यक्षा डॉ़ प्रज्ञा दया पवार 
संमेलनाध्यक्ष डॉ़प्रज्ञा दया पवार यांनी अ‍ॅड़ उज्वल निकम यांनी मांडलेल्या खैरलांजी प्रकरणातील काही भूमिकेस आपल्या अध्यक्षीय भाषणात तत्काळ खोडून काढले़ त्या म्हणाल्या, या प्रकरणात अंतर्भूत करता येणाºया काही बाबी झाल्या नाहीत़ दलित अत्याचार विरोधी कायदा तसेच महिलांवरील शारीरिक अत्याचारावर काहीच विचार झाला नाही़ या प्रकरणाचा विचार करता या सर्व सुट्या भागांचा विचार होणे आवश्यक होते़ निकम यांनी यावर सविस्तर बोलले पाहिजे होते़ परंतु, त्यांनी कायद्याच्या चौकटीत आपली बाजू प्रमाणिकपणे मांडली असावी़
 
प्रा. कृष्णा किरवले, प्राचार्य संध्या रंगारी पुरस्काराने सन्मानित 
अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या वतीने संमेलनात लेखकांना देण्यात येणाºया पुरस्कारांचे वितरणही झाले़ यंदाचा ‘ज्येष्ठ लेखक पुरस्कार’ कृष्णा किरवले यांना तर ‘ज्येष्ठ लेखिका पुरस्कार’ प्राचार्य संध्या रंगारी यांना देवून सन्मानित करण्यात आले़ 
 
संविधान रॅलीने दिला समतेचा संदेश 
सकाळी-सकाळी सुर्यदेवाचे स्वागत करताना आपल्या पारंपारिक नृत्याने मनावर मोहिनी घालणारे वासुदेव... महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत लक्ष वेधून घेणारी लहान मुले, विविध शाळकरी मुले आणि  कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघालेली संविधान ग्रंथ रॅलीने ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा आगाज सोडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कमधून दयानंद महाविद्यालयातील साहित्यनगरीपर्यंत निघालेल्या संविधान रॅलीने शनिवारी सकाळी अवघ्या लातुरकरांचे लक्ष वेधून घेतले. 

Web Title: Even after getting justice, there is no atrocity on Khalarangi; Bright Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.