वीरेंद्र तावडेची व्हिीडीओ कॉन्फन्सिंग २५ आॅक्टोंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 06:30 PM2017-09-21T18:30:18+5:302017-09-21T18:35:08+5:30

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडेचा संवाद हा व्हिडीओ कॉन्फरिन्संगद्वारे पुढील सुनावणीवेळी होईल, असे जिल्हा न्यायाधीश एल.डी.बिले यांनी सांगितले.

Videocon Conferencing of Virendra Tawde on Oct. 25 | वीरेंद्र तावडेची व्हिीडीओ कॉन्फन्सिंग २५ आॅक्टोंबरला

वीरेंद्र तावडेची व्हिीडीओ कॉन्फन्सिंग २५ आॅक्टोंबरला

Next
ठळक मुद्देगोविंद पानसरे हत्या प्रकरणी सुनावणीपानसरे यांनी कोणाशी पत्रव्यवहार केला याची माहिती मागवली गोविंद पानसरे यांचा बँक अकौंटचा तपशील मागितला संशयित समीर गायकवाड जामीनावर

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडेचा संवाद हा व्हिडीओ कॉन्फरिन्संगद्वारे पुढील सुनावणीवेळी होईल, असे जिल्हा न्यायाधीश एल.डी.बिले यांनी सांगितले.


तावडेचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी, वीरेंद्र तावडेबरोबर संवाद साधायचा आहे, त्यासाठी व्हिडीओ कॉन्फरिन्संग घ्यावी, अशी विनंती गुरुवारी सुनावणीवेळी केली. त्यावेळी बिले यांनी, पुढील सुनावणी ही २५ आॅक्टोंबर २०१७ ला होईल, त्या सुनावणीवेळी वीरेंद्र तावडेबरोबर संवाद साधू असे सांगितले.


गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित हा डॉ.वीरेंद्र तावडे हा आहे. या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड हा जामीनावर सध्या बाहेर आहे. याचबरोबर २८ फेब्रुवारी २०१७ ला सीआरपीसी ९१ नूसार गोविंद पानसरे यांची बँक अकौंटचा तपशील मागितला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याने त्यांचा पत्रव्यवहार तसेच ते वकील होते.त्यामुळे त्यांनी कोणा-कोणाशी पत्रव्यवहार केला आहे.याची माहिती मागितली आहे.

 

Web Title: Videocon Conferencing of Virendra Tawde on Oct. 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.