‘अकरावी’च्या प्रवेश प्रक्रियेचा सोमवारी प्रारंभ

By Admin | Published: July 2, 2017 05:52 PM2017-07-02T17:52:29+5:302017-07-02T17:52:29+5:30

अर्ज विक्री-स्वीकृतीची मुदत ८ जुलैपर्यंत; एकूण प्रवेशक्षमता १३५००

Starting eleven admission process on Monday | ‘अकरावी’च्या प्रवेश प्रक्रियेचा सोमवारी प्रारंभ

‘अकरावी’च्या प्रवेश प्रक्रियेचा सोमवारी प्रारंभ

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0२ : शहरातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ  सोमवारी होणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे  www.dydekop.org संकेतस्थळ आणि kolhapur11th Admission या मोबाईल अ‍ॅपवर प्रवेश प्रक्रियेची, महाविद्यालयांची माहिती उपलब्ध असणार आहे.

कोल्हापूर शहरात मराठी व इंग्रजी माध्यमांची एकूण ३३ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांतील १३१ तुकड्यांमधील एकत्रित प्रवेश क्षमता १३५०० आहे. या जागांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याची तयारी प्रवेश प्रक्रिया समितीकडून पूर्ण झाली आहे. प्रवेश अर्जातील प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक आणि पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. अपुरी माहिती असणारा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. प्रवेश प्रक्रियेबाबत काही तक्रारी असल्यास त्यांच्या निवारणासाठी कमला महाविद्यालय (कला शाखा), कॉमर्स कॉलेज (वाणिज्य) आणि विवेकानंद महाविद्यालय (विज्ञान) या ठिकाणी केंद्रे कार्यान्वित असणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक व प्रवेश प्रक्रियेचे अध्यक्ष एम. के. गोंधळी यांनी दिली.

दरम्यान, अर्जविक्री केंद्रांवर शनिवारी (दि. १) अर्ज पाठविण्यात आले आहेत. या वर्षी अर्जविक्री व स्वीकृतीची प्रक्रिया एकाच वेळी होत आहे. अर्जाची पडताळणी ‘ओएमआर’द्वारे संगणकावर होणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्जातील माहिती अचूक भरावी, असे आवाहन प्रवेश प्रक्रियेचे कार्याध्यक्ष प्राचार्य एन. व्ही. नलवडे यांनी केले. 

विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे...

‘एमसीव्हीसी’ प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांच्या शुल्कांत फरक आहे. महाविद्यालयांची यादी, प्रवेशक्षमता, विषयांची माहिती पुस्तिकेतून उपलब्ध होईल. प्रत्येक विद्यार्थ्याला एका शाखेचाच अर्ज मिळणार आहे. स्वत:ला हवे असणारे विषय संबंधित महाविद्यालयात आहेत का, याची खात्री करावी. महाविद्यालयांना प्राधान्य देताना गेल्या वर्षीचा ‘कट आॅफ पॉइंट’ लक्षात घ्यावा. प्रवेश अर्जाच्या छायांकित प्रतीसह दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आरक्षणाबाबतचे पुरावे देणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोहोच अवश्य घ्यावी.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

प्रवेश अर्ज विक्री व स्वीकृतीची अंतिम मुदत : ८ जुलै (सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच) अर्जछाननी व निवड यादी तयार करणे : ९ ते १६ जुलै निवड यादीची प्रसिद्धी : १७ जुलै निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे : १८ ते २१ जुलै रिक्त जागांवर व एटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेश : २२ व २४ जुलै अकरावीच्या वर्गांना प्रारंभ : २५ जुलै

अर्ज वितरण केंद्रे

कोल्हापूर हायस्कूल (खरी कॉर्नर) (दूरध्वनी क्रमांक : २६२४५०२) स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (२६२७०५३) कॉमर्स कॉलेज (२६४१२२४ / २६४०१५७) कमला कॉलेज (२५२२२१६) विवेकानंद कॉलेज (२६५८६१२) महावीर कॉलेज (२६५५५५८ / २६५१८३०)

अर्ज संकलन केंद्रे

महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (२६२६९८२/२६२६९७९) प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स (२६२५४३०/२६२०६८५) गोपाल कृष्ण गोखले कॉलेज (२६४२५४०) राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज (२६५४६५८) न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (२६५७०६३) शहाजी कॉलेज (२६४४२०४) के. एम. सी. कॉलेज (२५४२०८५)

प्रवेश पुस्तिका रंग

विज्ञान शाखा : पांढरा कला शाखा (मराठी माध्यम) : पिवळा कला शाखा (इंग्रजी माध्यम) : गुलाबी वाणिज्य शाखा (मराठी माध्यम) : हिरवा वाणिज्य शाखा (इंग्रजी माध्यम) : निळा

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

जन्मदाखला अथवा स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी पात्रता.

Web Title: Starting eleven admission process on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.