श्रीपूजक अजित ठाणेकरांना मारहाण

By admin | Published: June 23, 2017 01:11 AM2017-06-23T01:11:36+5:302017-06-23T01:11:36+5:30

‘पुजारी हटाओ’ वाद चिघळला : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत पालकमंत्र्यांच्या समोरच प्रकार

Shripajjak Ajit Thanakaras beat up | श्रीपूजक अजित ठाणेकरांना मारहाण

श्रीपूजक अजित ठाणेकरांना मारहाण

Next

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील ‘श्रीपूजक हटाओ’ मागणीच्या बैठकीत श्रीपूजक व भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर यांनी अश्लील हावभाव आणि कुत्सित हास्य केल्याने गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोरच महिलांनी त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी ठाणेकर यांना पोलीस गाडीतून सुरक्षितस्थळी हलविले. या घटनेने मंदिरातील श्रीपूजक व भाविक यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे स्पष्ट झाले.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची दि. ९ जूनला श्रीपूजक अजित ठाणेकर, बाबूराव ठाणेकर व योगेश जोशी यांनी घागरा-चोलीतील पूजा बांधली. त्याबद्दल भाविकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यातूनच श्रीपूजकांविरोधात मंदिरातील ‘श्रीपूजक हटाओ’ संघर्ष समितीने तीव्र आंदोलन उभारले गेले. पंढरपूर, शिर्डीच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरही शासनाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दुपारी साडेचारच्या दरम्यान बैठक सुरू झाली. सुरुवातीला आंदोलकांनी अंबाबाईच्या गाभाऱ्यात श्रीपूजकांकडून केले जाणारे गैरव्यवहार सांगितले. अन्य देवस्थाने कायद्यानुसार कशाप्रकारे शासनाच्या अखत्यारीत गेली, याची माहिती दिली. त्यानंतर श्रीपूजकांच्यावतीने बाबूराव ठाणेकर यांनी भूमिका मांडली. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव अजित ठाणेकर पुढे आले आणि म्हणाले, ‘भक्तांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने देवीला घागरा-चोलीचा पेहराव करण्यात आला नव्हता. झाल्या प्रकाराबद्दल श्रीपूजकांच्या प्रतिनिधीने वृत्तवाहिनीवर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. बाकी पालकमंत्री म्हणून जो काही निर्णय घेतील तो श्रीपूजक म्हणून आम्हाला मान्य असेल.’
त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंदिर शासनाच्या ताब्यात यावे यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन तीन महिन्यांत न्याय विधी खात्याकडे अहवाल द्यावा, असे सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘अजित ठाणेकर यांनी देवीला घागरा नेसवण्याऐवजी तो पायावर ठेवायला हवा होता. घागरा-चोली नेसवल्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्या दिलगिरी मागून संपत नाहीत. या गुन्ह्याबद्दल त्यांनी प्रायश्चित्त व शिक्षा म्हणून दोन दिवस अन्न-पाणी न घेता मंदिरात उपोषण करावे.’ पालकमंत्र्यांचा हा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळून लावला. तेथून काहीसा गोंधळ सुरु झाला. पालकमंत्री पुन्हा म्हणाले, ‘प्र्रत्येक गुन्ह्याला वेगळी शिक्षा असते. मी या गुन्ह्याबद्दल त्यांना जन्मठेप किंवा फाशी देऊ शकत नाही. तुम्ही शिक्षा सुचवा. त्यानंतर आंदोलक प्रतिनिधींनी ठाणेकर यांना कायमस्वरूपी मंदिर बंदी करावी, असे सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी ‘मला असे करता येणार ( पान ४ वर)
श्रीपूजक अजित ठाणेकरांना मारहाण

नाही,’ असे सांगितले.
पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलकांमध्येच ठाणेकर यांना काय शिक्षा द्यावी यावर गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी मागे बसलेले श्रीपूजक अजित ठाणेकर सर्वांकडे पाहत कुत्सित हास्य करत अश्लील हावभाव केले. हे पाहून आंदोलक संतप्त झाले. घोषणा देत ते अजित ठाणेकर यांना मारायला धावले. प्रसंगावधान राखून पोलिसांनी ठाणेकरांच्याभोवती कडे केले व त्यांना सभागृहाच्या बाहेर नेण्यासाठी मागच्या दाराकडे नेले. मात्र, तेथे कुलूप असल्याने ते मुख्य दरवाजात आले. त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकर्ते रवि चौगले त्यांच्या अंगावर धावून गेले. त्याचवेळी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हातातील पर्सने त्यास जोरदार मारहाण केली. त्यानंतर कार्यकर्तेही धावून गेले व जोरदार ओढाओढी झाली. त्यामध्ये ठाणेकर यांच्या शर्टाच्या चिंध्या झाल्या. त्यांचा चष्माही मोडला. त्याच अवस्थेत पोलिसांनी कडे करून त्यांना बाहेर काढले व आंदोलकांच्या तावडीतून सोडवत पोलीस गाडीतून सुरक्षितस्थळी निघून गेले.
भाजपकडूनही समर्थन नाही
या बैठकीस भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. परंतू त्यातील कुणीही ठाणेकर यांची बाजू घेतली नाही की त्यांना समर्थन दिले नाही. ठाणेकर यांना दुपारी पालकमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलविले होते परंतू त्यालाही ते गेले नाहीत असे भाजपचे पदाधिकारी सांगत होते. अजित, तुम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपवा असा सल्लाही कार्यकर्त्यांनी दिला होता परंतू ते कुणाचेच ऐकत नव्हते असे कार्यकर्ते जाहीरपणे मारहाणीनंतर सांगत होते.

दादा, नंबर एकचे
मंत्री व्हाल!
यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अंबाबाई मंदिर तातडीने पुजारीमुक्त करावे. दादा, तुम्ही तुमच्या अधिकारात हा निर्णय घ्या. अंबाबाईच्या आशीर्वादाने तुम्ही नंबर एकचे मंत्री व्हाल.
प्रवेशद्वार बंद करून दाखवा..
जिल्हाधिकारी कार्यालयास पश्चिम व उत्तर बाजूस मोठी लोखंडी प्रवेशद्वारे आहेत; परंतु ती नुसती नावालाच आहेत. ती बंद करता येत नाहीत. पश्चिमेकडेचा दरवाजा खाली उतरल्याने तो लावताच येत नाही तर उत्तरेकडील दरवाजा लावताना पोलिसांची रोजच दमछाक होते. अचानक आंदोलक आले तर हे गेट बंद करता येत नाहीत; परंतु त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.
जिल्हा प्रशासन गाफील..
याच प्रश्नावर बुधवारीही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याच उपस्थितीत बैठक झाली होती. त्यामध्ये श्रीपूजकांबद्दल भक्तांच्या भावना किती तीव्र आहेत याची चुणूक बघायला मिळाली होती. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत ते लक्षात घेऊन प्रशासनाने पुरेशी दक्षता घेतल्याचे दिसून आले नाही. पोलीस बंदोबस्त होता; परंतु पुजारी हटाव समितीचे लोक एका बाजूला व श्रीपूजक दुसरीकडे अशी बैठक व्यवस्था करायला हवी होती. श्रीपूजकांना मध्येच बसविले होते. स्वत: जिल्हाधिकारी सुभेदारही या बैठकीस तसे उशिराच आले.

कोल्हापूरचा इतिहास बदलेल
पंढरपूर, शिर्डीच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरही शासनाने ताब्यात घेऊन पुजारी नेमावा, याबाबतचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतल्यास कोल्हापूरचा इतिहास बदलेल, त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला न्याय मिळेल व शासनाला महसूल मिळेल,असे माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सांगितले. दादांनी हा निर्णय न घेतल्यास नाईलाजास्तव याबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.नाही,’ असे सांगितले.
पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलकांमध्येच ठाणेकर यांना काय शिक्षा द्यावी यावर गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी मागे बसलेले श्रीपूजक अजित ठाणेकर सर्वांकडे पाहत कुत्सित हास्य करत अश्लील हावभाव केले. हे पाहून आंदोलक संतप्त झाले. घोषणा देत ते अजित ठाणेकर यांना मारायला धावले. प्रसंगावधान राखून पोलिसांनी ठाणेकरांच्याभोवती कडे केले व त्यांना सभागृहाच्या बाहेर नेण्यासाठी मागच्या दाराकडे नेले. मात्र, तेथे कुलूप असल्याने ते मुख्य दरवाजात आले. त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकर्ते रवि चौगले त्यांच्या अंगावर धावून गेले. त्याचवेळी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हातातील पर्सने त्यास जोरदार मारहाण केली. त्यानंतर कार्यकर्तेही धावून गेले व जोरदार ओढाओढी झाली. त्यामध्ये ठाणेकर यांच्या शर्टाच्या चिंध्या झाल्या. त्यांचा चष्माही मोडला. त्याच अवस्थेत पोलिसांनी कडे करून त्यांना बाहेर काढले व आंदोलकांच्या तावडीतून सोडवत पोलीस गाडीतून सुरक्षितस्थळी निघून गेले.
भाजपकडूनही समर्थन नाही
या बैठकीस भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. परंतू त्यातील कुणीही ठाणेकर यांची बाजू घेतली नाही की त्यांना समर्थन दिले नाही. ठाणेकर यांना दुपारी पालकमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलविले होते परंतू त्यालाही ते गेले नाहीत असे भाजपचे पदाधिकारी सांगत होते. अजित, तुम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपवा असा सल्लाही कार्यकर्त्यांनी दिला होता परंतू ते कुणाचेच ऐकत नव्हते असे कार्यकर्ते जाहीरपणे मारहाणीनंतर सांगत होते.

दादा, नंबर एकचे
मंत्री व्हाल!
यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अंबाबाई मंदिर तातडीने पुजारीमुक्त करावे. दादा, तुम्ही तुमच्या अधिकारात हा निर्णय घ्या. अंबाबाईच्या आशीर्वादाने तुम्ही नंबर एकचे मंत्री व्हाल.
प्रवेशद्वार बंद करून दाखवा..
जिल्हाधिकारी कार्यालयास पश्चिम व उत्तर बाजूस मोठी लोखंडी प्रवेशद्वारे आहेत; परंतु ती नुसती नावालाच आहेत. ती बंद करता येत नाहीत. पश्चिमेकडेचा दरवाजा खाली उतरल्याने तो लावताच येत नाही तर उत्तरेकडील दरवाजा लावताना पोलिसांची रोजच दमछाक होते. अचानक आंदोलक आले तर हे गेट बंद करता येत नाहीत; परंतु त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.
जिल्हा प्रशासन गाफील..
याच प्रश्नावर बुधवारीही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याच उपस्थितीत बैठक झाली होती. त्यामध्ये श्रीपूजकांबद्दल भक्तांच्या भावना किती तीव्र आहेत याची चुणूक बघायला मिळाली होती. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत ते लक्षात घेऊन प्रशासनाने पुरेशी दक्षता घेतल्याचे दिसून आले नाही. पोलीस बंदोबस्त होता; परंतु पुजारी हटाव समितीचे लोक एका बाजूला व श्रीपूजक दुसरीकडे अशी बैठक व्यवस्था करायला हवी होती. श्रीपूजकांना मध्येच बसविले होते. स्वत: जिल्हाधिकारी सुभेदारही या बैठकीस तसे उशिराच आले.

कोल्हापूरचा इतिहास बदलेल
पंढरपूर, शिर्डीच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरही शासनाने ताब्यात घेऊन पुजारी नेमावा, याबाबतचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतल्यास कोल्हापूरचा इतिहास बदलेल, त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला न्याय मिळेल व शासनाला महसूल मिळेल,असे माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सांगितले. दादांनी हा निर्णय न घेतल्यास नाईलाजास्तव याबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Shripajjak Ajit Thanakaras beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.