ठळक मुद्देआयोजकांची समर्थनार्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांची विरोधात घोषणाबाजीकोल्हापुरात काही काळ तणावपोलिस बंदोबस्त कडक

कोल्हापूर, दि. ८ : कन्हैयाकुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत निर्दर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आहे. दरम्यान, आयोजकांनीही समर्थनात घोषणाबाजी केल्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने तणाव निवळला आहे.जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठातील विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याची आज, बुधवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सभा सुरु आहे. कन्हैय्याकुमार सभास्थानी येण्यापूर्वीच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून सभेस परवानगी दिल्याचा निषेध केला.यावेळी या कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवराय अशा घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून आॅल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी कन्हैय्याकुमारच्या सभेच्या समर्थनार्थ इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तणाव काही काळ निवळला.