कन्हैयाकुमारच्या कार्यक्रमास परवानी देऊ नये : कोल्हापूरात हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:21 PM2017-11-06T16:21:27+5:302017-11-06T16:25:17+5:30

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोही घोषणा देणाऱ्या  तसेच दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या  कन्हैयाकुमार याचा बुधवारी कोल्हापूरात कार्यक्रम होत आहे. त्याला प्रशासनाने परवागी देऊ नये, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनातर्फे सोमवारी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.

Kanhaiyyakumar's program should not be celebrated: Demand of pro-Hindu organizations | कन्हैयाकुमारच्या कार्यक्रमास परवानी देऊ नये : कोल्हापूरात हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

कन्हैयाकुमारच्या कार्यक्रमास परवानी देऊ नये : कोल्हापूरात हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देदेशद्रोही घोषणा देणाऱ्या तसेच दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या कन्हैयाकुमार याचा कार्यक्रम प्रशासनाने परवागी देऊ नये, या मागणीचे हिंदुत्ववादी संघटनातर्फे निवेदन

कोल्हापूर ,दि.  ०६ : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोही घोषणा देणाऱ्या तसेच दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या  कन्हैयाकुमार याचा बुधवारी कोल्हापूरात कार्यक्रम होत आहे. त्याला प्रशासनाने परवागी देऊ नये, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनातर्फे सोमवारी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.


२००१ मध्ये संसदेवरील दहशतवादी हल्लयाचा सुत्रधार व जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेचा महमंद अफजल गुरु याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ९ फेबु्रवारी २०१३ ला फाशी देण्यात आली. या देशद्रोही अफजलला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालयातील विद्यार्थी संघटनेने ९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी त्याचा स्मृती दिन साजरा केला.

या वेळी ‘अफझल हम शर्मिंदा है...तरे कातिल जिंदा है...’,‘भारत की बर्बादी तक जंग रहेगी...जंग रहेगी...’ अशा देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. या विद्यापीठाचा पूर्वइतिहास हा देशद्रोह आणि नक्षलवादाला खतपाणी घालणारा आहे. त्यामुळे या संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याचा बुधवारी (दि.८) कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशाी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.


शिष्टमंडळात चंद्रकांत बराले, दिलीप भिवटे, संभाजी साळोखे, महेश ऊरसाल, मनोहर सोरप, अशोक रामचंदानी, किशोर घाटगे, शिवानंद स्वामी,सुनील पाटील, संभाजी भोकरे, राजू यादव, अवधूत भाटे, मधुकर नाझरे, सुधाकर सुतार, जयदिप शेळके, सुवर्णा पवार, आदींचा समावेश होता
 

 

Web Title: Kanhaiyyakumar's program should not be celebrated: Demand of pro-Hindu organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.