सोईच्या ‘एस.टी.’कडे कामगारांची पाठ -: अवैध खासगी वाहनांतून प्रवास करण्यास वाढतोय कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:04 AM2019-07-11T01:04:50+5:302019-07-11T01:06:05+5:30

ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे व वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना अवैध

Lessons of the workers to 'ST' | सोईच्या ‘एस.टी.’कडे कामगारांची पाठ -: अवैध खासगी वाहनांतून प्रवास करण्यास वाढतोय कल

सोईच्या ‘एस.टी.’कडे कामगारांची पाठ -: अवैध खासगी वाहनांतून प्रवास करण्यास वाढतोय कल

Next
ठळक मुद्देअपघाताला निमंत्रण!

प्रदीप शिंदे ।
कोल्हापूर : ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे व वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना अवैध खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. हे लक्षात घेऊन परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने त्यांच्या सोईसाठी गावांतून एमआयडीसीपर्यंत एस.टी.ची विशेष सोय केली आहे. मात्र, याकडे कामगारांनी दुर्लक्ष करून अशा धोकादायक वाहतुकीद्वारे प्रवास करीत असल्याने पुन्हा एकदा अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.

गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित, शिरोली या औद्योगिक वसाहतींत ग्रामीण भागातील कामगार मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी येतात. काहीजण दुचाकीवरून प्रवास करतात; पण ज्यांच्याकडे दुचाकी नाही, त्या कामगारांना व्हॅन, अ‍ॅपे रिक्षा, रिक्षा, जीप यांतून प्रवास करावा लागतो आहे. हे वाहनधारक जास्त पैसे मिळविण्याच्या उद्देशाने जास्त प्रवासी बसवून जादा फेऱ्यांसाठी वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. रात्री-अपरात्री दुचाकीवरून प्रवास करताना कामगारांना समस्यांना सामोरे जावे लागते.

कामगार प्रवाशांच्या मागणीनुसार परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे कामगारांच्या सोईसाठी एस.टी. उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोकुळ शिरगाव, शिरोली, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालते. त्यानुसार एस.टी. गाड्या सोडण्याचे व कामगारांना ने-आण करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे कामगारांचा प्रवास सुखकारक आणि सुरक्षित होणार आहे.

उत्पन्न वाढविण्यासाठी खासगी वाहने !
आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एमआयडीसीमधील काही कर्मचाऱ्यांनी प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहने घेतली आहेत. यामधून ते इतर कर्मचाºयांना घेऊन जातात. एमआयडीसीमध्ये श्रमाचे काम, कामावर वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने अनियंत्रित वेगाने गाडी चालविल्याने डोळ्यांवर झापड येतेच; त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अपघातामुळे एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोल्हापूर विभागातर्फे २५ गाड्यांची सोय
एमआयडीसीला जाणाºया कामगारांसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने २५ गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये ७५ फेºयांची सोय केली आहे. यामध्ये कोल्हापूर आगारामधून ०२, संभाजीनगर ०२, गडहिंग्लज ०४, गारगोटी : ०३, कागल : १०, राधानगरी : ०४ या मार्गांवर गावातून गाडीची सोय केली आहे. मात्र, प्रवासी याकडे पाठ फिरवीत आहेत.
 

 

अवैध प्रवासातील धोके समोर आल्याने कामगारांच्या मागणीनुसार तीन शिफ्टमध्ये एस.टी.ची सोय केली आहे. यासाठी सवलतीचा पास दिला जातो. मात्र, बहुतांश कामगार एस.टी. बसची सेवा सुरक्षित असतानाही तिचा लाभ घेत नाहीत.
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग


उत्पन्न वाढविण्यासाठी खासगी वाहने !
आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एमआयडीसीमधील काही कर्मचाऱ्यांनी प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहने घेतली आहेत. यामधून ते इतर कर्मचाऱ्यांना घेऊन जातात. एमआयडीसीमध्ये श्रमाचे काम, कामावर वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने अनियंत्रित वेगाने गाडी चालविल्याने डोळ्यांवर झापड येतेच; त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अपघातामुळे एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोल्हापूर विभागातर्फे २५ गाड्यांची सोय
एमआयडीसीला जाणाºया कामगारांसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने २५ गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये ७५ फेºयांची सोय केली आहे. यामध्ये कोल्हापूर आगारामधून ०२, संभाजीनगर ०२, गडहिंग्लज ०४, गारगोटी : ०३, कागल : १०, राधानगरी : ०४ या मार्गांवर गावातून गाडीची सोय केली आहे. मात्र, प्रवासी याकडे पाठ फिरवीत आहेत.

अवैध प्रवासातील धोके समोर आल्याने कामगारांच्या मागणीनुसार तीन शिफ्टमध्ये एस.टी.ची सोय केली आहे. यासाठी सवलतीचा पास दिला जातो. मात्र, बहुतांश कामगार एस.टी. बसची सेवा सुरक्षित असतानाही तिचा लाभ घेत नाहीत.
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग

Web Title: Lessons of the workers to 'ST'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.