कोल्हापूर :  लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:58 PM2018-05-14T15:58:46+5:302018-05-14T15:58:46+5:30

चटणीचा हंगाम सुरू असताना यंदा लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही. आवकेत थोडी वाढ झाल्याने घसरण सुरूच असून, घाऊक बाजारात १० पासून २५ रुपयांपर्यंत दर आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींची मागणी वाढली असली तरी दर स्थिरच राहिले आहेत.

Kolhapur: The sharp fall in the garlic rates, the rate of 10 rupees in the wholesale market | कोल्हापूर :  लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर

कोल्हापूर :  लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर

googlenewsNext
ठळक मुद्दे लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर  भाजीपाला स्थिर, डाळींची मागणी वाढली

कोल्हापूर : चटणीचा हंगाम सुरू असताना यंदा लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही. आवकेत थोडी वाढ झाल्याने घसरण सुरूच असून, घाऊक बाजारात १० पासून २५ रुपयांपर्यंत दर आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींची मागणी वाढली असली तरी दर स्थिरच राहिले आहेत.

पावसाळ्यासाठी चटणी करण्याकरिता आपल्याकडे साधारणत: मार्च महिन्यापासूनच लगबग सुरू असते. त्यामुळे मार्च ते मे या तीन महिन्यांत मिरची, मसाला यांसह लसणाचे दर काहीसे चढेच असतात. यंदा मात्र लसणाच्या दरात घसरण थांबलेली नाही.

बाजार समितीत रोज लसणाच्या सातशे ते आठशे पोत्यांची आवक सुरू आहे. त्या प्रमाणात उठाव होत नसल्याने दरात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच घाऊक बाजारात लसूण दहा रुपयांपासून पंचवीस रुपये किलोपर्यंत राहिला आहे. तुलनेने कांदा व बटाट्याच्या दरांत चढउतार दिसत नाही.

भाजीपाल्याची स्थानिक आवक अजूनही चांगली असल्याने दर स्थिर राहण्यास मदत होत आहे. कोबी, वांगी, ढबू, गवार, भेंडी, कारली, दोडक्याचे दर गत आठवड्याच्या तुलनेत कायम आहेत. टोमॅटोच्या दरात सुरू असलेली घसरण थोडी थांबली असून, घाऊक बाजारात चांगल्या टोमॅटोच्या दरात थोडी सुधारणा झालेली आहे.

कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, बाजार समितीत रोज २२ हजार पेंढ्यांची आवक होत आहे. घाऊक बाजारात पाचपासून १७ रुपयांपर्यंत पेंढीचा दर आहे. मेथी, पालक, पोकळा या पालेभाज्यांचे दर स्थिर असून, पेंढीचा दर सरासरी दहा रुपये आहे.

सध्या पावसाळ्याकरिता डाळींचा साठा करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे डाळींचा उठाव होत असला तरी गतवर्षीच्या तुलनेत तूरडाळ व हरभरा डाळीचे दर फारच कमी आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो ६५ रुपये, तर हरभराडाळ ४९ रुपयांपर्यंत आहे.

शाबू, रवा, मैदा, ज्वारीसह इतर किराणा मालाच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली असून ते ८५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. साखरेच्या दरात फारसा फरक दिसत नाही.

हापूस सामान्यांच्या आवाक्यात!

कोकणासह कर्नाटक, गुजरातमधून आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे हापूस आंबा सामान्य माणसाच्या आवाक्यात आला असून, हंगामाच्या शेवटी-शेवटी का असेना, त्याची चव चाखायला मिळत आहे. कलिंगडांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून पावसामुळे त्यांची गोडी कमी झाली आहे.

 

हापूस आंब्यांची आवक अजून पंधरा दिवस अशीच राहील. दरात चढउतार असला तरी चांगल्या आंब्याचे दर २०० ते ६०० रुपये डझन अजूनही आहेत.
- सलीम बागवान,
फळांचे व्यापारी, बाजार समिती
 

 

Web Title: Kolhapur: The sharp fall in the garlic rates, the rate of 10 rupees in the wholesale market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.