प्रत्येकी पाच गण झाले आरक्षीत : बाजार समिती निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:36 PM2018-03-20T12:36:01+5:302018-03-20T12:36:01+5:30

शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगावचा समावेश

Five each of the reserved categories are reserved: Market Committee election | प्रत्येकी पाच गण झाले आरक्षीत : बाजार समिती निवडणूक

प्रत्येकी पाच गण झाले आरक्षीत : बाजार समिती निवडणूक

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 20 : नवीन कायदा व नियमानुसार कृषी उत्पन्न बाजार समितींच्या होणा:या निवडणुकीसाठी प्रत्येकी पाच जागांसाठी सोमवारी आरक्षण काढण्यात आले. शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या चार बाजार समितींसाठी ही निवडणूक होत आहे. आरक्षणानंतर आता प्रारूप मतदार याद्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
येत्या मे किंवा जून महिन्यात जिल्ह्यातील चारही बाजार समितींच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी प्रत्येकी 15 गण राहणार असून त्यातील पाच गणांचे आरक्षण सोडतद्वारे निश्चित करण्यात आले. त्यात दोन गण महिलांसाठी, एक इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी, एक विमुक्त व भटक्या जमातीसाठी तर एक अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव राहणार आहे. उर्वरित दहा जागा या सर्वसाधारण गटासाठी खुल्या राहणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या सोडतीत स्वत: जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, एस.वाय.पूरी, संदीप परदेशी, निरज चौधरी, गोविंद जोशी आदी उपस्थित होते. चार वर्षीय बालिका मेहक संदीप परदेशी याने सोडतची चिठ्ठी काढली.
गणांची आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर आता प्रारूप मतदार यादीकडे लक्ष लागून आहे. नवीन नियम व कायद्यानुसार बाजार समिती निवडणुकीत किमान दहा गुंठे जमीन असलेला शेतकरी हा मतदार राहणार आहे. त्यामुळे शेतक:यांना सर्वाधिक महत्त्व या निवडणुकीत असेल. 
पूर्वी ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थाचे संचालक हे मतदान करीत होते. आता त्यांच्या ऐवजी थेट किमान दहा गुंठे जमिन असलेला व किमान वर्षातून दोन वेळा बाजार समितीत शेतमाल विक्री करणारा शेतकरी मतदार राहणार  आहे. 
बाजार समितीचे कार्यक्षेत्र तालुका असल्यामुळे त्या त्या तालुक्यांचे शेतकरी मतदानासाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे आता प्रारूप मतदार यादीकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.शहादा बाजार समितीअंतर्गत 180 गावे असून एकुण 49 हजार 255 खातेदार आहेत. 15 गणांमध्ये मोहिदे तर्फे शहादा, कहाटूळ, कोंढावळ, वडाळी, कळंबु, शिरुडदिगर, प्रकाशा, वैजाली, पाडळदा बुद्रूक, धुरखेडा, म्हसावद, अंबापूर, सुलवाडे, सावखेडा, मंदाणे या गणांचा समावेश आहे. पैकी धुरखेडा व म्हसावद हे गण महिलांसाठी तर कहाटूळ इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी, शिरुडदिगर अनुसूचित जाती, जमातींसाठी तर प्रकाशा विमुक्त व भटक्या जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.तळोदा बाजार समितीअंतर्गत 94 गावे असून 27 हजार 3 खातेदार आहेत. एकुण 15 गणांमध्ये तळोदा एक, तळोदा दोन व तळोदा तीन, तळोदा, चार, तळोदा पाच, नळगव्हाण, नर्मदानगर, रेवानगर, प्रतापपूर, गोपाळपूर, बोरद, सिंगसपूर, आमलाड, खरवड व दलेलपूर या गणांचा समावेश आहे. पैकी तळोदा चार व प्रतापपूर हे महिलांसाठी राखीव आहेत. तळोदा तीन हा गण अनुसूचित जाती व जमातीसाठी, गोपाळपूर विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी तर दलेलपूर गण हा इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे.अक्कलकुवा बाजार समितीसाठी एकुण 193 गावांमधील 45 हजार 697 खातेदार आहेत. या अंतर्गत खटवाणी, नाला, खापर, कंकाळामाळ, मंडारा, मोरखी, मोरंबा, रामपूर, पिंपळखुटा, भगदरी, काठी, वेली, उमरगव्हाण, डाब, देवमोगरा या गणांचा समावेश आहे. पैकी मोरंबा व रामपूर हे गण महिलांसाठी राखीव झाले आहेत खटवाणी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी, पिंपळखुटा अनुसूचित जाती, जमातींसाठी तर डाब विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी राखीव राहणार आहे.धडगाव बाजार समितीअंतर्गत 15 गणात एकुण 99 गावांचा समावेश आहे. त्यातील एकुण खातेदार नऊ हजार 342 इतके आहेत. 15 गणांमध्ये रोषमाळ बुद्रूक, धनाजे बुद्रूक, उमराणी बुद्रूक, मुंदलवड, खरवड, खुंटामोडी, कात्री, खडक्या, नंदलवड, खर्डा, सिसा, असली, मनखेडी बुद्रूक, तलाई, काकडदा यांचा समावेश आहे. महिला प्रवर्गासाठी धनाजे बुद्रूक व मुंदलवड हे राखीव झाले आहेत. विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी खरवड, इतर मागास प्रवर्गासाठी खडक्या तर अनुसूचित जाती, जमातींसाठी काकडदा हा गण राखीव झाला आहे.
 

Web Title: Five each of the reserved categories are reserved: Market Committee election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.