कोल्हापूर :सीपीआरमध्ये दुर्बिणीद्वारे वृद्वेवर छिद्राची हृदयशस्त्रक्रिया : जयप्रकाश रामानंद, करडवाडीतील लक्ष्मी खतकर ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 05:00 PM2018-01-13T17:00:13+5:302018-01-13T17:05:45+5:30

शरीराची कोणतीही चिरफाड न करता पायाच्या नसेतून अतिसुक्ष्म दुर्बिणीच्याद्वारे कोल्हापूर जिल्हयातील करडवाडी (ता. भुदरगड) येथील लक्ष्मी कृष्णा खतकर (वय ७० ) वृद्धेवर हृदयामधील छिद्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्रथमच अशा प्रकारची ही शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

Kolhapur: Chiradra cardiovascular surgery in a CPR through a telescope: Jai Prakash Ramanand, Laxmi Khatkar in Karadwadi | कोल्हापूर :सीपीआरमध्ये दुर्बिणीद्वारे वृद्वेवर छिद्राची हृदयशस्त्रक्रिया : जयप्रकाश रामानंद, करडवाडीतील लक्ष्मी खतकर ठणठणीत

कोल्हापूर :सीपीआरमध्ये दुर्बिणीद्वारे वृद्वेवर छिद्राची हृदयशस्त्रक्रिया : जयप्रकाश रामानंद, करडवाडीतील लक्ष्मी खतकर ठणठणीत

Next
ठळक मुद्देसीपीआरमध्ये दुर्बिणीद्वारे वृद्वेवर छिद्राची हृदयशस्त्रक्रिया : जयप्रकाश रामानंदकरडवाडीतील लक्ष्मी खतकर ठणठणीत‘आपलं सीपीआर,चांगलं सीपीआर’

कोल्हापूर : शरीराची कोणतीही चिरफाड न करता पायाच्या नसेतून अतिसुक्ष्म दुर्बिणीच्याद्वारे कोल्हापूर जिल्हयातील करडवाडी (ता. भुदरगड) येथील लक्ष्मी कृष्णा खतकर (वय ७० ) वृद्धेवर हृदयामधील छिद्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्रथमच अशा प्रकारची ही शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. रामानंद म्हणाले, जन्मजात एखाद्या व्यक्तिला हृदयाला छिद्र असणे वेगळे.पण,उतरत्या वयात लक्ष्मी खतकर यांना हृदयविकाराचा (हार्ट अ‍ॅटॅक) झटका आला व त्यांच्या हृदयाला आश्चर्यकारकरित्या छिद्र (पीआय-व्हीएसआर-डीसी) पडले.

त्यांच्यावर प्रथम खासगी रुग्णालयानानंतर डिसेंबर २०१७ मध्ये त्यांना सीपीआरमध्ये आणण्यात आले. हृदयविभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बाफना व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले. बुधवारी (दि. १०) सुमारे सव्वातास लक्ष्मी खतकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.

याबाबत डॉ. अक्षय बाफना म्हणाले, हृदयास अशाप्रकारे छिद्र पडणे ही एक दुर्मिळ घटना आहे. या रुग्णाचा जीव वाचविणे हे एक आव्हानच होते. अतिसुक्ष्म दुर्बिण पायाच्या नसेतून हृदयापर्यंंत सावधगिरीने ही शस्त्रक्रिया करुन ते छिद्र बंद केले. १८ मिलिमीटरचे हे छिद्र होते.

खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे पाच ते दहा लाखांपर्यंत खर्च आहे. पण, याठिकाणी एक लाख २० हजार रुपयांत ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून केली. युरोपियन सोसायटी आॅफ कार्डिओलॉजीमध्ये याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या वृद्धेचे प्रकृति चांगली आहे.

यासाठी वैद्यकिय अधीक्षक डॉ.शिशिर मिरगुंडे, हृदयरोग विभागप्रमुख डॉ. रणजित जाधव, डॉ. माजिद मुल्ला, डॉ. रणजित पवार, भूलतज्ज्ञ डॉ. हेमलता देसाई, संजीवक अरुण पाटील, देवेंद्र शिंदे आदींनी परिश्रम घेतले. पत्रकार परिषदेस अभ्यागत समितीचे अशासकीय सदस्य सुनील करंबे उपस्थित होते.
 

 

Web Title: Kolhapur: Chiradra cardiovascular surgery in a CPR through a telescope: Jai Prakash Ramanand, Laxmi Khatkar in Karadwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.