गगनबावडा येथे हत्तीच्या हल्ल्यात 1 गंभीर, तर 4 किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 12:52 AM2017-08-16T00:52:22+5:302017-08-16T00:52:38+5:30

गावातील पाण्याच्या टाकीजवळ पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यात महादेव चंद्राप्पा हाळे ( वय ६०, रा रेव्याची वाडी, ता. गगनबावडा) हे गंभीररित्या जखमी झाले.

In Gaganbawada, 1 critical attack in Hatti and 4 minor injuries | गगनबावडा येथे हत्तीच्या हल्ल्यात 1 गंभीर, तर 4 किरकोळ जखमी

गगनबावडा येथे हत्तीच्या हल्ल्यात 1 गंभीर, तर 4 किरकोळ जखमी

googlenewsNext

कोल्हापूर, दि. 16 - सांगशी सैतवडेपैकी रेव्याची वाडी येथे वेताळ आश्रमजवळ दहीहंडीचा कार्यक्रम बघून घरी येत असताना गावातील पाण्याच्या टाकीजवळ पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यात महादेव चंद्राप्पा हाळे ( वय ६०, रा रेव्याची वाडी, ता. गगनबावडा) हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ सीपीआर येथे उपचारसाठी दाखल केले. पायाला व हाताला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अॅपल सरस्वती येथे दाखल केले. त्यांच्याबरोबर  पांडुरंग वरेकर( वय ४०), रामचंद्र बाळू भारमल (वय ४५ ) हे किरकोळ जखमी झालेत, त्यांच्यावरही अॅपल सरस्वती येथे उपचार सुरू आहेत. तर शिवाजी वरेकर ( वय ४५,),  पांडुरंग लटके (वय ४५) यांना ग्रामीण रुग्णालय गगनबावडा येथे उपचार सुरू आहेत. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सीपीआर येथे भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

Web Title: In Gaganbawada, 1 critical attack in Hatti and 4 minor injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.