मुश्रीफसाहेब...कागलमध्ये आता परिवर्तन अटळ - समरजित घाटगे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 06:37 PM2023-03-22T18:37:32+5:302023-03-22T19:12:12+5:30

दत्ता पाटील म्हाकवे : मतदारसंघातील लोकं रोज सकाळी दारात यावीत यासाठी गेल्या २५ वर्षांत विद्यमान आमदार यांनी चिकोञाचा प्रश्न ...

Change in Kagal is inevitable in upcoming elections, Samarjit Ghatge to MLA Hasan Mushrif | मुश्रीफसाहेब...कागलमध्ये आता परिवर्तन अटळ - समरजित घाटगे 

मुश्रीफसाहेब...कागलमध्ये आता परिवर्तन अटळ - समरजित घाटगे 

googlenewsNext

दत्ता पाटील

म्हाकवे : मतदारसंघातील लोकं रोज सकाळी दारात यावीत यासाठी गेल्या २५ वर्षांत विद्यमान आमदार यांनी चिकोञाचा प्रश्न मिटविला नाही की मोठे उद्योग आणून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. सत्तेत असताना घोषणा करायची नाही. माञ, सत्ता गेल्यानंतर निराधारांची पेन्शन दुप्पट करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे मुश्रीफ साहेब आपल्या राजकारणाचा छुपा अजेंडा लोकांच्या लक्षात आला असून २०२४ मध्ये याच मुद्द्यावर विक्रमी मताधिक्याने परिवर्तन अटळ आहे असा निर्धार भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी व्यक्त केला.

पिंपळगाव बुद्रुक (ता.कागल)येथे   बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व भव्य नागरी सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड व निराधारांची पेन्शन वाढीसाठी यशस्वी पाठपुराव्याबद्दल घाटगे यांचा नागरी सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू साखरचे माजी संचालक मारुतीराव पाटील होते. 

याप्रसंगी शाहू साखरचे संचालक डॉ.डी.एस.पाटील, स्नेहल प्रदीप पाटील यांची भाषणे झाली. यावेळी किसान मोर्चा अध्यक्ष प्रताप पाटील, पी.डी. चौगुले, ए. डी. पाटील, बाबुराव हिरुगडे, राजु जाधव, विश्वास माने, सावंता देवडकर आदी उपस्थित होते.  प्रास्ताविक माजी सरपंच प्रदीप पाटील यांनी केले. स्वागत आकाश पाटील तर खंबाजी पाटील यांनी आभार मानले.

जलजीवन मधून जिल्ह्याला २ हजार कोटी. 

केंद्र सरकारच्या जनजीवन योजनेतून कोल्हापूरातील गरज असणार्या अनेक गावात २हजार कोटींचा निधी आला आहे. यामध्ये कागलमधील ५० गावातील घरा घरापर्यत शुध्द पाणी पोहचणार आहे.तर राज्य शासनाने निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेंशन दीड हजार रुपये केली असून युवकांना रोजगार देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.त्यामुळे हे सरकार  जनसामान्यांना स्थैर्य देणारे असल्याचे घाटगे म्हणाले .

..पण गावात एसटीच पोहचली नाही

महिलांना शिंदे-भाजप सरकारने एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. माञ,आपल्या गावात अद्याप एसटीच पोहोचली नसल्याची खंत स्नेहल पाटील यांनी व्यक्त केली. याबाबत लवकरच गावात एसटीची सोय करण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही घाटगे यांनी दिली.

Web Title: Change in Kagal is inevitable in upcoming elections, Samarjit Ghatge to MLA Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.