मटक्यातील २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:34 AM2019-05-06T00:34:57+5:302019-05-06T00:35:02+5:30

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील मटका-जुगाराचे कनेक्शन चालविणाऱ्या राकेश मदनलाल अग्रवाल (वय ४६, रा. ...

Breaks of the turnover of 25 crores | मटक्यातील २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक

मटक्यातील २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक

Next

एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील मटका-जुगाराचे कनेक्शन चालविणाऱ्या राकेश मदनलाल अग्रवाल (वय ४६, रा. मथुरानगर, सांगली नाका, इचलकरंजी), विजय लहू पाटील (४९, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), सम्राट सुभाष कोराणे (३८, रा. शिवाजी पेठ) यांच्यावर पहिल्यांदाच पोलिसांनी कठोर कारवाई केली. या कारवाईचा परिणाम म्हणून कोल्हापूरसह सांगली, सातारा, बेळगाव या चार जिल्ह्यांतील रोजच्या २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागल्याची माहिती खुद्द पोलीसच देत आहेत.
पश्चिम महाराष्ट्राचे मटका-जुगाराचे केंद्र म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण, बेळगाव या सहा जिल्ह्यांतील मटका-जुगाराचे म्होरके अग्रवाल, कोराणे आणि विजय पाटील आहेत. त्यांचे नेटवर्क सांभाळण्यासाठी एक हजारच्या आसपास एजंटांचे जाळे विखुरलेले आहे. आतापर्यंत पोलिसांनी या तिघा म्होरक्यांवर कठोर कारवाईचा बडगा उचललाच नव्हता. त्यांच्या खालच्या एजंटांवरच कारवाई केली जात होती. यापूर्वी विजय पाटील आणि कोराणे यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी ती जुजबी होती. ओसवाल हा दिसायला साधा असला तरी त्याचे थेट मुंबईतून मटक्याचे कनेक्शन आहे. त्याची एकट्याची दिवसाची उलाढाल १० कोटी असल्याचे पोलीस सांगत आहेत.
मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅपवरून मटका
जिल्ह्यातील पानटपरी, गल्ली-बोळांत खुलेआम सुरू असलेले मटका, जुगार अड्डे आणि पिवळ्या-पांढºया चिठ्ठ्या बंद करून मोबाईल, एसएमएस व व्हॉट्सअ‍ॅपवरून मटका घेण्याची नवी पद्धत मटकाधारकांनी अवलंबली आहे. नुकतीच जुना राजवाडा पोलिसांनी विजय पाटील याच्यावर कारवाई केली.
गुन्हेगार एजंट
विजय पाटील याने राकेश ओसवाल, सम्राट कोराणे यांच्याशी हातमिळवणी करून या तिघांनी ‘झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग’ अशी जाहिरात करून पश्चिम महाराष्ट्रात जोमाने मटका पसरवला. गुन्हेगारीशी संबंधित तरुणांना त्यांनी आपले एजंट बनविले आहे. या मटक्यातून तिघांनी करोडो रुपयांची माया जमविली आहे.
कारवाईचे कौतुक
जिल्ह्यातून मटका व जुगार हद्दपार करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कठोर पाऊल उचलले आहे. त्यांच्या या कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

Web Title: Breaks of the turnover of 25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.