‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा; कोल्हापुरात दहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 11:55 AM2024-03-30T11:55:10+5:302024-03-30T12:02:14+5:30

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरूवारी रात्री छापा टाकला. ...

Betting on IPL match; A case has been registered against ten people in Kolhapur | ‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा; कोल्हापुरात दहा जणांवर गुन्हा दाखल

‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा; कोल्हापुरात दहा जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरूवारी रात्री छापा टाकला. यामध्ये ठाणे येथील बेटिंग चालक हरेश कन्हैयामल वारदनी (वय ४०, रा. उल्हासनगर, ठाणे) याला ताब्यात घेऊन दहा जणांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी रोख दोन हजार रुपये, दोन मोबाइल असा सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नरेश रोहिडा (रा. उल्हासनगर, ठाणे), विकी एन. आर., राहुल बुलाणी, मनीष गिडवाणी, रवी, अमित मोटीजा, किशू खान, मोहित, राजेश छाबरा, सनी आचरा यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अंदर-बाहर जुगारात ३८ जण ‘अंदर’! २३ मोबाइल जप्त

पापाची तिकटी परिसरात सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. यामध्ये ३८ जणांना ताब्यात घेऊन रोख २ लाख ८० हजार रुपये, २३ मोबाइल असा सुमारे ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ३८ जणांना ताब्यात घेण्यात आले. व्यवसाय मालक, जागा मालक, व्यवस्थापक, खेळ घेणाऱ्यासह तीन कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Betting on IPL match; A case has been registered against ten people in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.