आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 07:23 AM2024-06-08T07:23:36+5:302024-06-08T07:30:19+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 08 June 2024 | आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल

आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल

मेष - आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. भावंडांशी सलोखा राहील. त्याचा फायदा मिळेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आणखी वाचा

वृषभ - आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. आर्थिक लाभ व नियोजन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

कर्क -  आज शरीर व मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा ह्यामुळे निर्णय घ्यायला अतिशय कठिण होईल. आईच्या स्वास्थ्याची काळजी वाटेल. पैसा खर्च होईल. गैरसमज व वाद-विवाद ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आणखी वाचा 

सिंह -  आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. घरात मंगल कार्ये ठरतील. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. आणखी वाचा

कन्या -  आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान - सन्मान वाढेल. सरकार कडून लाभ होईल. आणखी वाचा

तूळ - आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल. परदेशगमनाच्या संधी येतील व परदेशस्थ स्नेह्यांकडून बातम्या मिळतील.  आणखी वाचा

वृश्चिक -  उक्ती व कृती यांवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे - पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. अभ्यासासाठी आजचा दिवस चांगला आहे. आणखी वाचा

धनु - मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. बौद्धिक, तार्किक विचार विनिमय होईल. भागीदारीत लाभ होईल. आणखी वाचा

मकर - आज व्यापार - व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण - घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. मातृ घराण्याकडून चांगली बातमी समजेल. प्रतिस्पर्ध्याला पराजित कराल. आणखी वाचा

कुंभ - आज अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका. प्रवासात अडचणी येतील, म्हणून शक्य असेल तर प्रवास स्थगित करावा. आणखी वाचा

मीन - आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद - विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल.  आणखी वाचा

 

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 08 June 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app