विकासाच्या भावनेतूनच ‘राष्ट्रवादी’ शी युती : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 03:04 PM2017-10-04T15:04:02+5:302017-10-04T15:10:30+5:30

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात विकासाच्या भावनेतूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली असून त्यात गैर कांही वाटत नाही. राजकारणांपेक्षा कारखान्यांच्या आणि शेतकºयांच्या हिताला महत्व देवून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Alliance with 'Nationalist' through the spirit of development: Chandrakant Dada Patil | विकासाच्या भावनेतूनच ‘राष्ट्रवादी’ शी युती : चंद्रकांतदादा पाटील

विकासाच्या भावनेतूनच ‘राष्ट्रवादी’ शी युती : चंद्रकांतदादा पाटील

Next
ठळक मुद्देबिद्री साखर निवडणूकीचे राजकारणसर्व २१ जागा चांगल्या मताधिक्याने जिंकू रविवारी, ८ आॅक्टोबरला निवडणूक होणार

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात विकासाच्या भावनेतूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली असून त्यात गैर कांही वाटत नाही. राजकारणांपेक्षा कारखान्यांच्या आणि शेतकºयांच्या हिताला महत्व देवून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कारखान्याच्या निवडणूकीत सर्व २१ जागा चांगल्या मताधिक्याने आम्ही जिंकू असाही विश्र्वास पाटील यांनी व्यक्त केला. येत्या रविवारी, ८ आॅक्टोबरला ही निवडणूक होत आहे.


राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी ही भ्रष्टाचारवादी पार्टी असल्याची टीका भाजपने सातत्याने केली आहे. मग असे असताना त्याच पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय का घेतला अशी विचारणा केल्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले,‘राजकारण की विकास असा जेव्हा प्रश्र्न येतो तेव्हा भाजपने कायमच विकासाला महत्व दिले आहे.

देशाच्या राजकारणातही १९६७ ला जनसंघाने मध्यप्रदेश,राजस्थान व गुजरातमध्ये तत्कालीन काँग्रेसविरोधी पक्षांना एकत्र आणून सत्ता मिळवली होती. जनता पार्टीमध्येही जनसंघ हा महत्वाचा घटक होता. आम्ही विकासापेक्षा, देशापेक्षा कधी स्वत:ला मोठ मानलं नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात २४ पक्ष एकत्र येवून देशात सरकार स्थापण केले होते. आताही भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारमध्ये विविध ८ पक्ष सहभागी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसशी कारखान्याच्या निवडणूकीत युती केली यात गैर कांही वाटत नाही. राजकारणात आम्ही तेवढे लवचिक आहोत.’


ते म्हणाले,‘ बिद्री हा देशातील पहिल्या पाचमध्ये येवू शकेल अशी क्षमता असलेला चांगला कारखाना आहे. प्रशासकांच्या काळातही उत्साह वाढविणारे काम तिथे झाले आहे. सहवीज प्रकल्प उत्तम पध्दतीने सुरु आहे. गेल्या हंगामात एफआरपी आणि १७५ रुपये दुसरा हप्ता दिला आहे. अजूनही टनांस किमान शंभर रुपये दिले जावू शकतात. अशीही चांगली बसलेली घडी विस्कळीत होवू नये यासाठी आम्ही पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलो. ’


भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून ताकद आजमावण्याचा विचार का केला नाही असे विचारल्यावर मंत्री पाटील म्हणाले,‘भिंतीवर डोके आपटून मृत्यू पत्करण्यापेक्षा मी नेहमी व्यावहारिक विचार करणारा माणूस आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आम्ही स्वतंत्र पॅनेल करून विजयाप्रत पोहोचण्याएवढी आमची नक्कीच ताकद नाही. त्यामुळे कुणातरी सोबत जाण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता.
बिद्रीत एवढे लक्ष घातले असल्याने विधानसभेला राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला मंत्री पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.

ते म्हणाले,‘सहकार संस्था असो की स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही कोणत्याही पक्षासोबत एकत्र यायला अडचण नाही. विधानसभेची निवडणूकही पक्षीय पातळीवर होते. एका कारखान्याच्या निवडणूकीतील युतीवरून विधानसभेचा अंदाज तो ही दोन वर्षे अगोदर बांधणे फारच घाईचे होईल.

मी स्वत: या मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही हे यापूर्वीही स्पष्ट केले आहे. परंतू कांही झाले तरी या मतदार संघातून भाजपचा आमदार करण्याचे माझे टार्गेट आहे. त्यासाठी या मतदार संघातील विकासाचे प्रश्र्न मार्गी लावणार आहे. इतकी चांगली कामे करु की लोकांना भाजपचा आमदार निवडून देणे भाग पडेल.’

Web Title: Alliance with 'Nationalist' through the spirit of development: Chandrakant Dada Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.