गुळाच्या थकबाकीपोटी उचलले पेट्रोल पंपावरील ११ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:23 AM2021-03-18T11:23:39+5:302021-03-18T11:29:40+5:30

Farmer Kolhapur-शेतकरी सहकारी संघाच्या एका संचालकाच्या गुळाची थकबाकी भागवण्यासाठी चक्क चार पेट्रोल पंपांवरील अकरा लाखांची उचल करण्याचा प्रताप संघ व्यवस्थापनाने केला आहे. संबंधित संचालकांच्या नावावार डिझेल व पेट्रोल विक्री दाखवून या पैशांची उचल केली असली तरी अकरा लाखांचे साडे चार वर्षांचे ४ लाख ५० हजार व्याज माफ करण्याचा प्रयत्न असल्याने काही संचालक व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

11 lakh at petrol pumps due to jaggery arrears | गुळाच्या थकबाकीपोटी उचलले पेट्रोल पंपावरील ११ लाख

गुळाच्या थकबाकीपोटी उचलले पेट्रोल पंपावरील ११ लाख

Next
ठळक मुद्दे शेतकरी संघ संचालकांचा प्रताप पैसे घेणारा संचालक नामनिराळा, उलट व्याजमाफीसाठी धडपड

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या एका संचालकाच्या गुळाची थकबाकी भागवण्यासाठी चक्क चार पेट्रोल पंपांवरील अकरा लाखांची उचल करण्याचा प्रताप संघ व्यवस्थापनाने केला आहे. संबंधित संचालकांच्या नावावार डिझेल व पेट्रोल विक्री दाखवून या पैशांची उचल केली असली तरी अकरा लाखांचे साडे चार वर्षांचे ४ लाख ५० हजार व्याज माफ करण्याचा प्रयत्न असल्याने काही संचालक व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कारभारी मंडळीमुळेच संघ आतबट्यात आला. गेल्या पाच वर्षांत संघाचा गाडा रुळावर येईल, असे वाटत असतानाच अनेक प्रकारामुळे संघाच्या विश्वासार्हतेपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. निवडणुकीनंतर एका संचालकाने संघाच्या गूळ अडत दुकानात गूळ लावण्यापोटी अकरा लाखांच्या ॲडव्हांसची उचल केली. गेली साडेचार वर्षे त्यातील एक दमडीही भरली नाही.

संघाच्या पोटनियमानुसार जर घेतलेल्या ॲडव्हांसची हंगामात परतफेड झाली नाही तर त्यावर व्याज आकारणी करायची असते. त्यानुसार अकरा लाख मुद्दल व ४ लाख ५० हजार व्याज झाले. हा मुद्दा गेली दोन वर्षे संघाच्या संचालक मंडळात गाजत आहे. शासकीय लेखा परीक्षकांनी या थकबाकीवर आक्षेप घेत भरण्याचे आदेश दिले, तरीही संबधित संचालकाने पैसे भरले नाहीत.

लेखा परीक्षकांच्या कारवाईतून वाचण्यासाठी त्र्यंबोली, बिद्री, नेसरी व कार्वे या पेट्रोल पंपांवर संबंधित संचालकाच्या नावे डिझेल व पेट्रोल विक्री उधारीवर दाखवून तेथील अकरा लाखांची उचल केली. ते गुळाच्या थकबाकीला भरले. यावर एका युवा संचालकाने जोरदार हरकत घेत भांडाफोड करण्याची धमकी दिल्यानंतर संबंधित संचालकाने सहा लाख रुपये जमा केले. मात्र, उर्वरित पाच लाख व व्याज भरणार नाही, यावर ते ठाम आहेत.

पाच लाखांचा धनी कोण?
संचालकाने ११ लाख आपल्या नावावर उचल केली आणि त्यातील दुसऱ्या संचालकाला पाच लाख दिले. ते संचालक सध्या अपात्र असल्याने त्यांनी हात वर केल्याचे समजते. त्यामुळे पाच लाखांचा धनी कोण? देणारा, घेणारा की द्यायला लावणारा, याविषयी संघात जोरदार चर्चा सुरू आहे.

एका चॉकलेटसाठी कर्मचारी निलंबित

तात्यासाहेब मोहिते, बाबा नेसरीकर यांच्यासारख्या नेत्यांनी संघाला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले, त्यामागे त्यांचा त्याग होता, कर्मचाऱ्यांना लावलेली शिस्त होती. मेडिकलच्या दुकानात सुटे पैसे नसले तरी ग्राहकांना चॉकलेट दिले जात होते. त्या चॉकलेटच्या बरणीतील एक चॉकलेट कमी होते, म्हणून बाबा नेसरीकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला एक दिवस निलंबित केले होते.

शाखा दुरुस्तीच्या नावाखाली ३६ लाख खर्च

संघाने नंदगाव येथे नऊ लाखांचे शेड उभा केले. वास्तविक टेंडर काढून ही प्रक्रिया राबवणे अपेक्षित होते. मात्र, आपल्या जवळच्या ठेकेदाराला काम दिले. गेल्या वर्षभरात शाखा दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल ३६ लाख भांडवली खर्च पडल्याचे समजते.


गुळापोटी सगळ्यांनाच ॲडव्हांस दिले जाते, ह्यत्याह्ण संचालकाचे ११ लाख थकीत होते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यांनी पैसे भरले आहेत, साडेचार लाख व्याजमाफीसाठी त्यांनी अर्ज केला आहे.
- जी. डी. पाटील,
अध्यक्ष, शेतकरी संघ

Web Title: 11 lakh at petrol pumps due to jaggery arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.