तब्बल २० महिने 'ती'च्या पोटात होते टॉवेल

By admin | Published: November 25, 2014 06:33 PM2014-11-25T18:33:32+5:302014-11-25T18:33:32+5:30

खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेचे सिझेरियन केल्यानंतर छोटा टॉवेल त्या महिलेच्या पोटातच राहून गेल्याचा धक्कादायक प्रकार इंदौरमध्ये घडला आहे.

Towel was in the stomach for 20 months | तब्बल २० महिने 'ती'च्या पोटात होते टॉवेल

तब्बल २० महिने 'ती'च्या पोटात होते टॉवेल

Next

ऑनलाइन लोकमत 

इंदौर, दि. २५ - मध्यप्रदेशमधील इंदौर येथे डॉक्टरांचा भोंगळ कारभार उघड करणारी घटना घडली आहे. खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेचे सिझेरियन केल्यानंतर छोटा टॉवेल त्या महिलेच्या पोटातच राहून गेला होता. तब्बल २० महिन्यानंतर हा टॉवेल त्या महिलेच्या पोटातून काढण्यात आला असून निष्काळजीपणा करणा-या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. 
इंदौरमधील फरीदा नामक महिला १५ मार्च २०१३ रोजी खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झाली होती. सिझेरियनद्वारे तिची प्रसूती झाली होती. मात्र या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांचा लहान टॉवेल त्या महिलेच्या पोटात राहिला. यानंतर त्या महिलेने डॉक्टरांकडे वारंवार पोटदुखीची तक्रारही केली मात्र तिची पोटदुखी कमी होत नव्हती. अखेर गेल्या महिन्यात पिडीत महिलेने दुस-या डॉक्टरांकडे धाव घेतली. या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिची सोनोग्राफी केली असता पोटात टॉवेल आढळून आला. नुकतीच या महिलेवर पुन्हा शस्त्रक्रिया करुन टॉवेल बाहेर काढण्यात आला आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून मंगळवारी महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी संबंधीत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. 

Web Title: Towel was in the stomach for 20 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.