आश्चर्यकारक - सिंगापूरच्या प्राणी संग्रहालयातील हंसाचं पिल्लू चक्क घालतो शूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 02:20 AM2017-08-21T02:20:50+5:302017-08-21T16:41:30+5:30

सिंगापूरच्या प्राणिसंग्रहालयातील या हंसाची सद्या बरीच चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. हंसाचे हे पिल्लू चक्क शूज घालून येथे फिरताना दिसून येते.

 Shoes used in Singapore's swan zoo | आश्चर्यकारक - सिंगापूरच्या प्राणी संग्रहालयातील हंसाचं पिल्लू चक्क घालतो शूज

आश्चर्यकारक - सिंगापूरच्या प्राणी संग्रहालयातील हंसाचं पिल्लू चक्क घालतो शूज

Next

सिंगापूरच्या प्राणिसंग्रहालयातील या हंसाची सद्या बरीच चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. हंसाचे हे पिल्लू चक्क शूज घालून येथे फिरताना दिसून येते. सिंगापूरच्या ज्यूरोंग बर्ड पार्कमध्ये गतवर्षी एका हंसाच्या पिलाचा जन्म झाला. प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी त्याची देखभाल करतात. प्राणिसंग्रहालयातील काँक्रिटच्या जागेवरून फिरताना या पिल्लाला त्रास होतो. त्यामुळे या पिल्लासाठी मऊ शूज तयार करण्यात आले आहेत. हे पिल्लू जेव्हा बाहेर निघते, तेव्हा त्याला शूज घातले जातात. या शूजची डिझाइन अशी आहे की, त्याच्या पायाला ते फिट बसतात. पिल्लू मोठे होईपर्यंत आणि पाय मजबूत होईपर्यंत त्याला शूज वापरण्याची गरज असल्याचे प्राणिसंग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title:  Shoes used in Singapore's swan zoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.