मुळ चित्रात मोनालिसा नग्न होती का ?    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:54 PM2017-10-02T16:54:57+5:302017-10-02T18:54:55+5:30

जगातलं पहिलं चित्र असा ज्याचा उल्लेख केला जातो ते लिओनार्डो – द – विंचीनं काढलेलं मोनालिसाचं चित्र सध्या चर्चेत येण्याला कारणही तसंच दमदार आहे.

Found Monalisa's original naked picture | मुळ चित्रात मोनालिसा नग्न होती का ?    

मुळ चित्रात मोनालिसा नग्न होती का ?    

googlenewsNext
ठळक मुद्देनव्याने सापडलेल्या चित्रातील चेहरा आणि हाताची ठेवण पाहता मोनालिसाच्या चित्राशी साम्य दिसून येतंमोनालिसाच्या चित्रासारखं हूबेहुब एक चित्र पॅरीसच्या शास्त्रज्ञांना सापडलं आहे.1519 मध्ये मरण पावलेल्या त्या महान कलाकाराविषयी आपण विवेक आणि आदर बाळगला पाहिजे.

प्रख्यात चित्र मोनालिसा हे मुळात नग्न व्यक्तीचं चित्र असल्याच्या चर्चांना सध्या जागतिक वर्तुळात उत आला आहे.

जगातलं पहिलं चित्र असा ज्याचा उल्लेख केला जातो ते लिओनार्डो – द – विंचीनं काढलेलं मोनालिसाचं चित्र सध्या चर्चेत येण्याला कारणही तसंच दमदार आहे.  झालं असं की मोनालिसाच्या चित्रासारखं हूबेहुब एक चित्र पॅरीसच्या शास्त्रज्ञांना सापडलं आहे. मात्र त्यातील व्यक्तीच्या अंगावर एकही वस्त्र दिसत नाही. ती व्यक्ती हूबेहुब विंचीच्या मोनालिसासारखी दिसते. या चित्रावर जगभरातील शास्त्रज्ञ आणि कलातज्ञ गेला महिनाभर काम करीत आहेत. तेथील एका आर्ट गॅलरीमध्ये या दोन्ही फोटोंवर अभ्यास चालु आहे. आता सापडलेला फोटो विंचीच्या पहिल्या प्रख्यात फोटोचा सुरुवातीचा भाग असण्याची शक्यता, तज्ञ बोलून दाखवत आहेत.

फोटो सौजन्य - www.thesun.co.uk

1862 पासून फ्रेंचलगत असलेल्या चॅन्टीलीच्या राजवाड्यातील काँड म्यूजियम येथील रेनेन्सन्स आर्ट गॅलरीमध्ये हा फोटो सापडला. त्या आर्ट एक्झिबिशनचा एक भाग म्हणून तेथे मोठे कोरीव काम करण्यात आले आहे. तेथे हा फोटो सर्वांच्या नजरेसमोर आला.

याबाबत जागतिक वृत्तसंस्थेशी बोलताना क्युरेटर मॅथिरू डेल्डिक्यू म्हणाले की, ‘नव्याने सापडलेल्या चित्रातील चेहरा आणि हाताची ठेवण पाहता मोनालिसाच्या चित्राशी साम्य दिसून येतं. ती फक्त नक्कल किंवा योगायोग असू शकत नाही. आधीचे चित्र आणि आता सापडलेले चित्र यांतील आकार, कागद आणि रंगामध्येही बरंच साम्य आहे. ’ अश्या बऱ्याच साम्यता आढळल्याने कलातज्ञ मोनालिसा मुळ चित्रात विवस्त्र असल्याचा दावा ठामपणे करीत आहेत. हे शोधून काढण्यासाठी लिओनार्डोने जीवनाच्या शेवटच्या काळात मोनालिसासंबंघित काही काम केलं असेल का याचा शोध चालू आहे.

Also Read : चंद्रावरही होईल कायमस्वरूपी वसाहत, थ्री डी प्रिंटेड इमारती उभ्या राहतील 

याबाबतची उत्सुकता कायम असताना लूव्हर कॉन्झर्व्हेशन एक्सपर्ट ब्रुनो मोटीन म्हणाले की, ‘1519 मध्ये मरण पावलेल्या त्या महान कलाकाराविषयी आपण विवेक आणि आदर बाळगला पाहिजे.’ ते पुढे म्हणाले की, ‘ड्रॉईंगच्या वरच्या भागाचा अभ्यास करता ते एका उजव्या हाताच्या व्यक्तीने केल्याचे दिसते. लिओनार्डो मात्र डावरा होता. खरंतर या गोष्टीची शहानिशा करायला थोडा वेळ लागणार आहे. कारण हा विषय आणि ते चित्र दोन्ही नाजूक गोष्टी आहेत. दोन वर्षांत या प्रकरणाचा उलगडा करून सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न आहे.’

Web Title: Found Monalisa's original naked picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.