जामनेरात सुरुवातीला शुकशुकाट, दुपारनंतर मतदारांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 07:16 PM2018-04-06T19:16:09+5:302018-04-06T19:16:09+5:30

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर पालिका निवडणुकीसाठी मतदान

Shukushkat initially in Jamnara, Voters queue after noon | जामनेरात सुरुवातीला शुकशुकाट, दुपारनंतर मतदारांच्या रांगा

जामनेरात सुरुवातीला शुकशुकाट, दुपारनंतर मतदारांच्या रांगा

Next
ठळक मुद्देजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बीओटी कॉप्लेक्स मधील जि.प. शाळेत केले मतदानसकाळी १० वाजेपर्यंत झाले केवळ ६.५ टक्के मतदानदुपारी ३ वाजेनंतर सर्वच मतदान केंद्रावर महिला व पुरुष मतदारांच्या रांगा

आॅनलाईन लोकमत
जामनेर,दि.६ : नगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले. त्यानंतर सर्वच केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसुन येत होत्या. सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीच्या दोन तासात सर्वच मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. प्रभाग १, २ मधील केंद्रांवर महिलांची गर्दी होती. कष्टकरी व श्रमीक महिलांनी कामावर जाण्यापुर्वीच मतदान करण्यास पसंती दिल्याने सकाळी १० वाजेपर्यंत ६.५ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
दुपारी २ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर अपेक्षीत असलेली मतदारांची गर्दी न झाल्याने उमेदवारांची घालमेल वाढतच होती. प्रभाग निहाय मतदार याद्यांमधुन मतदान न केलेल्यांची नावे शोधुन त्यांना घरातुन बाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करतांना दिसत होते.
दुपारी ३ वाजेनंतर सर्वच केंद्रांवर महिला व पुरुष मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसत होत्या. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दुपारी बीओटी कॉप्लेक्स मधील जि.प. शाळेत तर नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सकाळी मतदान केले. नगराध्यक्षपदाच्या आघाडीच्या उमेदवार प्रा.अंजली पवार यांनी पुरा भागातील जि.प. शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.

Web Title: Shukushkat initially in Jamnara, Voters queue after noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.