पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन जळगावात पोलिसाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 08:02 PM2018-08-27T20:02:27+5:302018-08-27T20:05:54+5:30

पत्नीचे सहकारी पोलिसाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन यावल पोलीस स्टेशनला नेमणुकीला असलेल्या रुपेश विश्वनाथ पाटील (वय ३३) या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री जळगावातील शिव कॉलनीत घडली.

Police suicide in Jalgaon suspected of having immoral relationship with wife | पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन जळगावात पोलिसाची आत्महत्या

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन जळगावात पोलिसाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देशिव कॉलनीत घेतला गळफासआत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठीसंशयित आरोपी असलेल्या पोलिसाला अटकरविवारी रात्री १२ वाजता संपविली जीवनयात्रा

जळगाव : पत्नीचे सहकारी पोलिसाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन यावल पोलीस स्टेशनला नेमणुकीला असलेल्या रुपेश विश्वनाथ पाटील (वय ३३) या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री जळगावातील शिव कॉलनीत घडली.
दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला याच पोलीस स्टेशनला कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी सागर रमजान तडवी तसेच सासू, सासरे व दोन शालक यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर तडवी याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिव कॉलनीत रविवारी मध्यरात्री १२ वाजता रुपेश पाटील या पोलिसानेआत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनचे किरण पाटील व राहूल खोडे यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर दोन वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. रात्री प्रथम या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर सोमवारी दुपारी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर सोमवारी दुपारी साडे बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Police suicide in Jalgaon suspected of having immoral relationship with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.