कर्जबाजारी मनपाने ११ कोटी ३६ लाखांची बिले केली अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:36 PM2019-04-21T12:36:12+5:302019-04-21T12:36:45+5:30

नऊ महिन्यात ७३८ बिले मंजूर

The loan defaulters paid bills of 11 crore 36 lakh | कर्जबाजारी मनपाने ११ कोटी ३६ लाखांची बिले केली अदा

कर्जबाजारी मनपाने ११ कोटी ३६ लाखांची बिले केली अदा

googlenewsNext

जळगाव : आम्ही कर्जबाजारी असून आमच्याकडे पैसे नसल्याची ओरड करणाऱ्या महानगरपालिकेने १ जुलै २०१८ ते ३१ मार्च २०१९ या नऊ महिन्यात ठेकेदारांची तब्बल ११ कोटी ३६ लाख ४५ हजार २११ रूपयांची बिले अदा केल्याची माहिती समोर आली आहे़
ही माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्ता दीपककुमार गुप्ता यांना माहिती अधिकारात ही माहिती मनपाकडून पुरविण्यात आली आहे.
महानगरपालिका कर्जात बुडालेली असताना कर्मचाऱ्यांचे पगार करण्यास सुध्दा असमर्थ आहे़ एवढेच नव्हे तर शहरातील मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी केल्यानंतर मनपाकडे पैसे नसल्याची ओरड केली जात असते. दुसरीकडे शिक्षकांचे पन्नास टक्के वेतनाचे सुमारे पंधरा कोटी रूपये महानगरपालिकाकडे थकीत आहे़ त्यासाठी शिक्षक आंदोलन करून आपले हक्काच्या वेतनासाठी मनपाशी झगडत आहेत़ दुसरीकडे मात्र, मनपाकडे पैसे नसताना ठेकेदारांची बिले कशी अदा झाली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे़
नऊ महिन्याचा कालावधी
तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे असताना मागील वर्षी मनपाकडे पैसे नसताना ठेकेदारांची बिले अदा केली गेली असल्याची माहिती गुप्ता मिळाली. यावर त्यांनी १५ जानेवारी २०१९ रोजी १ जुलै २०१८ ते ३१ मार्च २०१९ या नऊ महिन्यात किती बिले अदा झालीत याबाबत माहिती अधिकारात अर्ज केला होता़
आंदोलनाच्या इशाºयानंतर माहिती
अनेक वेळा माहितीसाठी चकरा मारून सुध्दा माहिती मिळत नसल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला़ यावर त्यानुसार नुकतीच वेगवेगळ्या विभागातील बिले अदा झाल्याचे अकरा पानांचे प्रत त्यांना देण्यात आले. यावर अनेक ठेकेदारासह अनेकांना बिले अदा केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
७३८ बिले केली पास
महानगरपालिकेने नऊ महिन्यात सुमारे विविध निधीतून विविध कामांची ७३८ बिले पास केली आहे़ यामध्ये सर्वसाधारण निधीतून ८ कोटी ४२ लाख २९ हजार ६३४ रूपयांची ४१९ बिले अदा केली आहे़ तसेच निवडणूक फंडातून १ कोटी ५६ लाख ६४ हजार ८८७ रूपयांची ३०९ बिले तर एक बिल १ कोटी ४० लाख ७ हजार ६४५ रूपयांचे काढण्यात आले आहे़ रस्त्यांच्या दुरूस्तीचे २६ लाख ८२ हजार रूपयांचे सहा बिले तर र्इंडस इंड प्रकारातील तीन बिले १ कोटी २० लाख ७४ हजार ८०५ रूपयांची अदा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले़ तसेच निवडकच ठेकेदारांची बिले अदा झाल्याचा अरोप त्यांनी केला आहे. याशिवाय पेस्ट कंट्रोलसाठी जवळपास लाखो रुपयांची तीन बिले अदा करण्यात आली आहे.
पेस्ट कंंट्रोल- (चार बिले) - २६ लाख रुपये
टी़ ए़ पाटील- १६ लाख ४ हजार ६११
गणेश व्हिडिओ - ११ लाख ६ हजार
शिवा सिक्युरिटी सर्व्हीसेस - ६ लाख ६० हजार
एस़ के़ कॉन्ट्रॅक्टर ५ लाख ८२ हजार
पी़ आर पाटील (अ‍ॅड)- ५ लाख २५००
याबाबत आपण काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. या प्रकराची सविस्तर माहिती घेऊ. जर काही महत्त्वाची कामांची बिले असतील तर ती अदा करावीच लागतील. अन्यथा कामे कशी होणार?
-उदय टेकाळे, आयुक्त

Web Title: The loan defaulters paid bills of 11 crore 36 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव