जळगाव जिल्हा रुग्णालयात रुग्णाला दिलेल्या आहारात जीवंत आळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:55 PM2018-07-28T12:55:16+5:302018-07-28T12:55:49+5:30

धक्कादायक प्रकार

Lived in the diet given to the patient in Jalgaon District Hospital | जळगाव जिल्हा रुग्णालयात रुग्णाला दिलेल्या आहारात जीवंत आळी

जळगाव जिल्हा रुग्णालयात रुग्णाला दिलेल्या आहारात जीवंत आळी

Next
ठळक मुद्देवेळीच प्रकार लक्षात आल्याने पुढील त्रास टळला तक्रार करणार

जळगाव : जिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातवाईकांना दिलेल्या वरण-भातामध्ये जीवंत आळी निघाल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात घडला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
चोपडा येथील अलियाबी फिरोज पठाण या पाच वर्षीय बालिकेच्या पायाला दुखापत झाल्याने गुरुवारपासून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज जेवण देण्यात येते. ते जेवण घेण्यासाठी अलियाबी या बालिकेची आई गेली असता त्या वेळी त्यांना वरण-भात देण्यात आले. ताटात वरण-भात टाकल्यानंतर त्यात आळी चालत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्या वेळी सदर महिलेने हा वरण-भात बाजूला काढून ठेवला.
जिल्हा रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात आणि त्यांना जर येथे अशा प्रकारचे जेवण दिले जात असेल तर त्यांची प्रकृती सुधारेल की आणखी खालावेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Web Title: Lived in the diet given to the patient in Jalgaon District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.