जळगाव न्यायालयात अन्न भेसळच्या १९ खटल्यात सव्वा तीन लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:05 AM2018-02-08T00:05:53+5:302018-02-08T00:07:05+5:30

 अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार बुधवारी न्यायालयात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात १९ खटले निकाली काढण्यात आले. या खटल्यातील ३२ जणांकडून ३ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, हे अभियान यशस्वी झाल्याने आता तालुकास्तरावरही अभियान राबविले जाणार आहे.

Jalgaon court acquits fine of three and a half lakhs of fine for adulteration in 19 cases of food adulteration | जळगाव न्यायालयात अन्न भेसळच्या १९ खटल्यात सव्वा तीन लाखाचा दंड वसूल

जळगाव न्यायालयात अन्न भेसळच्या १९ खटल्यात सव्वा तीन लाखाचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देविशेष अभियान  आता तालुकास्तरावर राबविणार अभियान१९ खटल्यात ३२ आरोपी


आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,७ :  अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार बुधवारी न्यायालयात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात १९ खटले निकाली काढण्यात आले. या खटल्यातील ३२ जणांकडून ३ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, हे अभियान यशस्वी झाल्याने आता तालुकास्तरावरही अभियान राबविले जाणार आहे.
दाखल खटल्यांचा निपटारा करण्यासाठी बुधवारी न्या. एस.एस.घोरपडे यांच्या समक्ष विशेष न्यायालय भरविण्यात आले. यात अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त मिलिंद शहा, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, व्यापारी असोसिएशनचे ललित बरडिया यांच्यासह अधिकारी आणि जिल्हा व्यापारी महामंडाळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. 
अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ हा कायदा ४ आॅगस्ट २०११ रोजी संपुष्टात आला. त्याऐवजी अन्न सुरक्षा व मानके हा कायदा २००६ हा कायदा ५ आॅगस्ट २०११ रोजी अस्तित्वात आला. अन्न भेसळ कायद्यांतर्गत मानकानुसार नसलेल्या व लेबल व्यवस्थित न लावलेले अनेक प्रकरणे वर्षानूवर्ष प्रलंबित होती. दंड आकारुन प्रकरणे निकाली काढण्यासाठी अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट, अन्न सुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे, नाशिक विभागाचे सह आयुक्त उदय वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान राबविण्यात आले.

Web Title: Jalgaon court acquits fine of three and a half lakhs of fine for adulteration in 19 cases of food adulteration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.