जळगावात एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना मदत करणाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 07:13 PM2018-04-12T19:13:40+5:302018-04-12T19:13:40+5:30

जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना पोषक आहार देणाºया दात्यांचा सत्कार अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे नुकताच करण्यात आला.

Felicitated victims of HIV infected orphaned children in Jalgaon | जळगावात एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना मदत करणाऱ्यांचा सत्कार

जळगावात एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना मदत करणाऱ्यांचा सत्कार

Next
ठळक मुद्दे४४ मुलांना पोषक आहाराचे वाटपआहार वाटप करणाºया दात्यांचा सत्कारएचआयव्हीग्रस्त बालकांसाठी औषधांसोबत पोषक आहार गरजेचा

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१२ : जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना पोषक आहार देणाºया दात्यांचा सत्कार अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे नुकताच करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन होते. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नाभाभी जैन, सुमतीलाल टाटिया, यजुर्वेंद्र महाजन, डॉ. जयवंत मोरे, नीलिमा शेठीया, भारती पाटील, रेणू प्रसाद, दिलीप गांधी आदी होते.
गेल्या तीन वर्षांपासून जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विहान काळजी व आधार केंद्र आहे. ज्या द्वारे एचआयव्ही बाधित व्यक्ती व मुलांना मदत केली जाते. केंद्रात येणाºया एचआयव्ही बाधित बालकांना औषधासोबत पोषक आहार खूप महत्त्वाचा असतो. कार्यक्रमाचे औचित्य साधून या वेळी जळगाव जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित ४४ मुलांना पोषक आहार वाटप करण्यात आला. तसेच पोषक आहार वाटप करणाºया दात्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यशस्वितेसाठी अपूर्वा वाणी, वंदना पवार, साधना बडगुजर, कल्पना जैन, संगीता सोनवणे, सरोज बाविस्कर, सुनीता तायडे, दीपक संदानशिव, राजश्री पगारिया यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Felicitated victims of HIV infected orphaned children in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव