मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाची कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 05:52 PM2019-01-30T17:52:59+5:302019-01-30T17:55:46+5:30

मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई नवीन मंदिरावर तालुका मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीमध्ये तालुका कार्यकाराणीची समिती गठित करण्यात आली.

Executive Committee of Muktainagar Taluka Maratha Samaj | मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाची कार्यकारिणी गठित

मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाची कार्यकारिणी गठित

Next
ठळक मुद्देअध्यक्षपदी अनंतराव देशमुखउपाध्यक्षपदी माणिकराव पाटील व रामराव पाटील१९ फेब्रुवारीला सर्व पक्षीय व सर्वसमावेशक शिवजयंती महोत्सव सोहळा ११ एप्रिल रोजी मराठा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा ठराव

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील श्री संत मुक्ताबाई नवीन मंदिरावर तालुका मराठा समाजाची बैठक बुधवारी दुपारी रमेश ढोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीमध्ये तालुका कार्यकाराणीची समिती गठित करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी अनंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष माणिकराव पाटील, रामराव पाटील, सचिव यु.डी.पाटील, सहसचिव संदीप बागुल, भाऊराव पाटील, कोषाध्यक्ष वसंतराव पाटील तसेच सल्लागार समितीमध्ये अ‍ॅड.रवींद्र पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश ढोले, सुधीर तराळ, विलास धायडे, डॉ.बी.सी.महाजन तर सदस्य म्हणून भागवत विठ्ठल पाटील, रामभाऊ शिवराम पाटील, माणिकराव ओंकार पाटील, रघुनाथ सीताराम पाटील, ईश्वर शंकर रहाणे, अ‍ॅड.पंडित लक्ष्मण पाटील, साहेबराव बळीराम पाटील, नवनित दत्तात्रय पाटील, नीळकंठ सीताराम महाजन, भास्कर लक्ष्मण पाटील, पंडित गुलाबराव पाटील, रवींद्र साहेबराव पाटील, दिनेश शंकरराव कदम, दिलीप श्रीराम पाटील, उद्धव पाटील, संतोष सुपडू मराठे, भाऊराव परभत पाटील, नरेंद्र माणिकराव पाटील, संचालाल तुकाराम वाघ, गोपाळ गंभीर पाटील अशी कार्यकारिणी सर्वानुुमते गठित करण्यात आली.
याप्रसंगी बैठकीत १९ फेब्रुवारीला सर्व पक्षीय व सर्वसमावेशक शिवजयंती महोत्सव सोहळा साजरा करणे, दुष्काळाची परिस्थिती पाहता समाजातील वधू-वर पालकांना समाजाचा आधार मिळावा यासाठी ११ एप्रिल रोजी मराठा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा ठरावदेखील या बैठकीत करण्यात आला.

Web Title: Executive Committee of Muktainagar Taluka Maratha Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.