बोदवड येथे स्वस्त धान्य दुकानातील साठ्यात तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:19 PM2018-10-15T21:19:20+5:302018-10-15T21:20:33+5:30

लोकशाही दिनी केलेल्या तक्रारीच्या आधारे येथील एका स्वस्त धान्य दुकानाची जिल्हा पुरवठा विभागाकडून चौकशी केली असता, त्यात धान्यसाठ्यात तफावत आढळली. याआधारे हे प्रकरण चौकशीसाठी बोदवड पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

The discrepancy in cheaper grains store at Bodwad | बोदवड येथे स्वस्त धान्य दुकानातील साठ्यात तफावत

बोदवड येथे स्वस्त धान्य दुकानातील साठ्यात तफावत

googlenewsNext
ठळक मुद्देलोकशाही दिनी केलेल्या तक्रारीची दखलबोदवड पोलीस करणार दुकानदाराची चौकशी

बोदवड, जि.जळगाव : लोकशाही दिनी केलेल्या तक्रारीच्या आधारे येथील एका स्वस्त धान्य दुकानाची जिल्हा पुरवठा विभागाकडून चौकशी केली असता, त्यात धान्यसाठ्यात तफावत आढळली. याआधारे हे प्रकरण चौकशीसाठी बोदवड पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
शहरात ग्रामीण महिला संस्थेला स्वस्त धान्य दुकान चालविण्यासाठी देण्यात आले आहे. या स्वस्त धान्य दुकानाबाबत मध्यंतरी लोकशाही दिनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार (क्रमांक ९३/१८) करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे जिल्हा पुरवठा विभागाने मे महिन्यात बोदवड येथे येवून चौकशी केली. या दुकानात स्वस्त धान्याचे गहू हे सुमारे एक क्विंटल ७४ जास्त, तर तांदूळ ९५ किलो कमी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यात आलेले आढळले नाही. फक्त वाटप धान्याच्या एकूण उपलब्ध साठ्यापैकी फक्त १७ टक्के धान्य वाटप करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले. गोरगरिबांना धान्यापासून वंचित ठेवल्याचा ठपका जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने ठेवला आहे. याआधारे हे प्रकरण बोदवड पोलिसांकडे चौकशीसाठी पाठवले आहे.
या प्रकाराने खळबळ उडाली असून, या प्रकणारात सुमारे अडीचशे कार्डधारकांच्या कार्डाचे धान्य परस्पर काढल्याची चर्चा होत आहे. याबाबत बोदवड पुरवठा अधिकारी संजय पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी अधिक बोलणे टाळले.




 

Web Title: The discrepancy in cheaper grains store at Bodwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.