धुळ्य़ातील गुडय़ा खून प्रकरणी इंदूरमधून दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:38 PM2017-07-29T12:38:27+5:302017-07-29T12:46:29+5:30

सीसीटीव्हीची मदत घेवून धुळे जिल्हा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली़

Two persons arrested from Indore in connection with Dhule's murder | धुळ्य़ातील गुडय़ा खून प्रकरणी इंदूरमधून दोन जणांना अटक

धुळ्य़ातील गुडय़ा खून प्रकरणी इंदूरमधून दोन जणांना अटक

Next
ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात धुळ्यात 8 ते 9 पथकांची नियुक्ती इंदूर बायपास येथे दोन संशयित असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 29 - रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्डय़ा याच्या खून प्रकरणानंतर तपास कामाला धुळे पोलिसांनी गती दिलेली आह़े शनिवारी सकाळी या प्रकरणातील संशयित राजा उर्फ भद्रा देवरे आणि विलास उर्फ छोटा पापा गोयर यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या़ पोलीस बंदोबस्तात त्यांना धुळ्यात आणण्यात आल़े 
मंगळवार 18 जुलै रोजी सकाळी गुडय़ाचा खून झाल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला़ सीसीटीव्हीची मदत घेवून धुळे जिल्हा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली़ त्यासाठी 8 ते 9 पथकांची नियुक्ती करण्यात आली. टप्प्याटप्प्याने या घटनेतील मुख्य संशयित आरोपी आणि त्यांना मदत करणा:यांना पकडण्याचे काम सध्या या विशेष पथकांद्वारे जोमाने सुरु आह़े याप्रकरणातील मुख्य संशयित 7 आणि त्यांना मदत करणारे 6 संशयिताना पकडण्यात आले आह़े 
शनिवारी सकाळी मध्यप्रदेश राज्यातील इंदूर बायपास येथे दोन संशयित असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार सापळा रचण्यात आला़ मोठय़ा शिताफिने राजा उर्फ भद्रा देवरे आणि छोटापापा उर्फ विलास श्याम गोयर यांना ताब्यात घेण्यात आल़े 
भद्रा याला देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या पथकाने तर छोटापापा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले आह़े पुढील तपास सुरु आह़े 

Web Title: Two persons arrested from Indore in connection with Dhule's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.