सर्वांना सोबत घेवून जळगाव शहराचा विकास करणार : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 09:18 PM2018-08-11T21:18:14+5:302018-08-11T21:19:26+5:30

मनपा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे मला जळगावचा विकास करायचा असून राजकारण बाजूला ठेवत सर्वांना सोबत घेत जळगावचा विकास लवकरात लवकर करुन दाखवू, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

Developing Jalgaon City with all the people: Girish Mahajan | सर्वांना सोबत घेवून जळगाव शहराचा विकास करणार : गिरीश महाजन

सर्वांना सोबत घेवून जळगाव शहराचा विकास करणार : गिरीश महाजन

Next
ठळक मुद्देजळगावकरांच्या आश्वासनपूर्तीसाठी प्रयत्नराजकारण बाजूला ठेऊन सर्वांना सोबत घेणारवर्षभरात अनेक कामे मार्गी लागतील

जळगाव: मनपा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे मला जळगावचा विकास करायचा असून राजकारण बाजूला ठेवत सर्वांना सोबत घेत जळगावचा विकास लवकरात लवकर करुन दाखवू, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
वर्षभरात अनेक कामे मार्गी लागतील
मनपा निवडणुकीत जनतेने भाजपावर विश्वास ठेवून बहुमत दिले. यामुळे आम्हाला आता केवळ काम करायचे आहे. जळगावचा चेहरा मोहरा बदलून दाखवायचा आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकाकरकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. वर्षभरातच बरीचशी कामे मार्गी लागलेली जळगावकरांना दिसतील असा आत्मविश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

Web Title: Developing Jalgaon City with all the people: Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.