वाघूरमधून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:23 AM2019-06-14T11:23:28+5:302019-06-14T11:27:23+5:30

मनपाने गिरणातील पाण्यावर पुन्हा आरक्षण करावे : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Demand for the release of rotation from Waghur for agriculture | वाघूरमधून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

वाघूरमधून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

Next

जळगाव : वाघूर धरणातून उजव्या व डाव्या कालव्यात शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने लाभसिंचन समितीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
समितीने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळी कापूस लागवडीसाठी दरवर्षाप्रमाणे लाभसिंचन समितीने पाण्याची मागणी केली. वाघूर धरण विभागाकडून पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी आवर्तन सोडणे शक्य आहे, असे सांगितले. मात्र त्याबाबत लाभसिंचन समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घ्यावी, असे वाघूर धरण विभागातर्फे सांगण्यात आले. त्यानुसार २० मे रोजी समिती सदस्यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली असता वाघूर धरण विभागाकडून पाणीसाठ्याची माहिती मागवून निर्णय घेऊ, असे सांगितले. २७ मे रोजी समिती सदस्यांनी पुन्हा जिल्हाधिकाºयांची भेट घेतली असता वाघूर धरण विभागाकडून पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य आहे, असा अहवाल प्राप्त झाल्याचे सांगितले. परंतू कृषी अधिकाºयांच्यामते ३१ मेच्या आधी कापूस लागवड केली तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्ळामुळे मे ऐवजी १ ते ७ जून दरम्यान आवर्तन सोडू, असे सांगितले.
वाघूर धरणाच्या लाभक्षेत्रात येतअसलेल्या जळगाव, भुसावळ तालुक्यातील शेतकºयांना सिंचनासाठी वाघूर धरण हाच एकमेव पर्याय असल्यामुळे त्या परिसरातील लाभधारक शेतकरी पाटाला पाणी सुटणार, या भरवशावर होता. २७ मे रोजी आवर्तन सोडणे शक्य असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. मात्र ३ जून रोजी भेट घेतली असता वाघूर धरण विभागाकडून पाणी सोडणे शक्य नसल्याचा अहवाल आला असल्याचे सांगितले. यावरून प्रशासन व शासन हे या धरणासाठी आपली सोन्यासारखी जमीन देणाºया श्ोतकºयांबाबत उदासीन आहे. शेतकºयांनी या धरणासाठी जमीन दिली, त्यांचे काय? असा सवाल शेतकºयांनी केला आहे.
१५० दलघमीचे आवर्तन सोडा
सद्यस्थितीत वाघूर धरणात १२०० दलघमी जिवंत पाणीसाठा असून त्यापैकी सिंचनासाठी केवळ १०० ते १५० दलघमी पाण्याचे आवर्तन सोडावे लागणार आहे. त्यामुळे या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. मात्र त्याबाबत काहीही हालचाल न झाल्याने प्रशासन व शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी सर्व लाभधारक शेतकºयांनी काळ्या फितीलावून लाक्षणिक उपोषण केले. त्यात जि.प. सदस्य लालचंद पाटील, किशोर चौधरी, पं.स. सभापती यमुनाबाई रोटे, भादली विकासो चेअरमन मिलिंद चौधरी, राजेंद्र चौधरी भादली बु., धनराज कोल्हे, असोदा, योगेश नारायण पाटील, नशिराबाद, बेलव्हाळ सरपंच मनिष खाचणे, निमगाव बु. सरपंच प्रियंका पाटील, बेळी सरपंच शालिनी भंगाळे, ललित बºहाटे, नशिराबाद, वराडसीम सरपंच प्रशांत खाचणे, खेमचंद महाजन यांच्यासह श्ोतकरी सहभागी झाले होते.
जलसंपदाने ने निर्णय घ्या
पाऊस लांबला असून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. वाघूरवर जळगाव मनपासह विविध पाणीयोजनांचे आरक्षण आहे. ते आरक्षित पाणी तसेच बाष्पीभवन या सगळ्यांचा विचार करून या पाणी योजनांना १५ जुलैपर्यंत पाणी राहील, याचा विचार करून जलसंपदाविभागाने अतिरिक्त पाणी असल्यास ते शेतीला सोडायचे की नाही? याचा निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकाºयांनी शिष्टमंडळाला सांगितले. तसे जलसंपदाविभागालाही कळविण्यात आले असल्याचे समजते.

Web Title: Demand for the release of rotation from Waghur for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.