जळगावात बहिणाबाई महोत्सवात सांस्कृतीक मेजवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:11 PM2018-02-06T13:11:22+5:302018-02-06T16:25:56+5:30

अभिनेत्री सई ताम्हणकर व सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती ; शाहीर रामानंद उगले यांच्या शब्दात ‘महाराष्ट्राची लोकधारा’

Cultural festival from Jalgaon at the Bahinabai festival | जळगावात बहिणाबाई महोत्सवात सांस्कृतीक मेजवाणी

जळगावात बहिणाबाई महोत्सवात सांस्कृतीक मेजवाणी

googlenewsNext
ठळक मुद्देविविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया दहा मान्यवरांचा बहिणाबाई पुरस्कार देऊन होणार सन्मानअभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या प्रकट मुलाखतीसोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमजालना येथील शाहीर रामानंद उगले यांच्या शब्दात ‘महाराष्ट्राची लोकधारा’

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.६ : भरारी फाउंडेशनतर्फे ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान सागर पार्क, जळगाव येथे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या प्रकट मुलाखतीसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. यावेळी जालना येथील शाहिर रामानंद उगले हे ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन ७ रोजी दुपारी १ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल. यावेळी बहिणाबाई पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता ‘स्त्री शक्ती सन्मान सोहळा’ हा कार्यक्रम होईल. ७.३० ते रात्री १० या दरम्यान स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० यावेळेत स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. त्यानंतर ७.३० ते ९.३० या दरम्यान जालना येथील शाहीर रामानंद उगले व सहकाºयांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम होईल. ९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होईल. १० रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भारूडकार निरंजन भाकरे यांचा कार्यक्रम होईल.
रविवार ११ रोजी समारोप सोहळा होणार आहे. यात संध्याकाळी ७.३० वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहिली. त्यानंतर रात्री ८.३० वाजता महोत्सवाचा समारोप होईल.
बहिणाबाई पुरस्कारार्थी
बहिणाबाई महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºयांना ‘बहिणाबाई’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रात चैत्राम पवार, गौरी सावंत, वासंती दिघे, सांस्कृतिक क्षेत्रासाठी शाहीर शिवाजी पाटील,क्रीडा क्षेत्रासाठी शीतल महाजन, शिक्षण क्षेत्रासाठी हर्षल विभांडिक, गोपाळ चव्हाण, डॉ.एस.एस.राणे, महिला सक्षमीकरणासाठी हेमा अमळकर,साहित्य क्षेत्रासाठी माया धुप्पड यांना गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Cultural festival from Jalgaon at the Bahinabai festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.