रहस्यमय 'राक्षस' या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच, 23 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 06:01 PM2018-01-18T18:01:44+5:302018-01-18T18:03:54+5:30

'जंगल ना गाणं कधी ऐकलंय का?' असा प्रश्न विचारत रहस्यमय अशा आगामी 'राक्षस'या मराठी चित्रपटाचा  टीजर आज (गुरुवारी) लाँच करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून 'नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन'चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांची 'समित कक्कड फिल्म्स' प्रस्तुत  'राक्षस' या आगामी चित्रपटाच्या नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.

The mysterious 'monsters' Marathi film will be teaser launch on February 23 | रहस्यमय 'राक्षस' या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच, 23 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

रहस्यमय 'राक्षस' या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच, 23 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

Next

मुंबई :  'जंगल ना गाणं कधी ऐकलंय का?' असा प्रश्न विचारत रहस्यमय अशा आगामी 'राक्षस'या मराठी चित्रपटाचा  टीजर आज (गुरुवारी) लाँच करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून 'नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन'चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांची 'समित कक्कड फिल्म्स' प्रस्तुत  'राक्षस' या आगामी चित्रपटाच्या नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता याचा टीजर लाँच झाल्यामुळे आणखीनच उत्सुकता वाढली आहे. 
'राक्षस' या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश झोटिंग करत असून अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र पहायला मिळणार आहे. या टीजर मधून 'राक्षस'ही आदिवासी, जंगल या भोवती फिरणारी कथा असल्याचे दिसते. आदिवासी पाड्यावर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. 
'जंगल गाणं गातं, ते हसतं - रडतं त्याला भावना असतात' असे यामध्ये म्हटले आहे. याचबरोबर,  दुसरीकडे एक मुलगी आपल्या आईला म्हणतेय 'आई, बाबांना जंगलातल्या राक्षसाने गिळलंय'. या संवादामुळे रहस्य वाढलेल्या 'राक्षस' चित्रपचात नक्की काय दडलेले आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढल्याचे दिसून येते. 
दरम्यान, 'राक्षस' चित्रपटात शरद केळकर, सई ताम्हणकर यांच्या बरोबरच ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर आदींच्या भूमिका आहेत.  'राक्षस' चित्रपट येत्या 23 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: The mysterious 'monsters' Marathi film will be teaser launch on February 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.