मुक्ताईनगर येथे सी.एम. चषकाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 06:44 PM2018-11-18T18:44:13+5:302018-11-18T18:45:23+5:30

सीएम चषक अंतर्गत मुक्ताईनगर येथे तालुका क्रीडा संघाच्या पटांगणावर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सी.एम.चषकाचे उद्घाटन करण्यात आले.

CM at Muktainagar Inauguration of the tournament | मुक्ताईनगर येथे सी.एम. चषकाचे उद्घाटन

मुक्ताईनगर येथे सी.एम. चषकाचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देखेळामुळे दुरावा दूर होतो : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेमैदान तयार करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचा झाला गौरव२५ रोजी बेरोजगार युवकांसाठी मेळावा

मुक्ताईनगर, जि.जळगाव : सीएम चषक अंतर्गत मुक्ताईनगर येथे तालुका क्रीडा संघाच्या पटांगणावर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सी.एम.चषकाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदू महाजन, प्रा.डॉ.सुनील नेवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, माजी सभापती विलास धायडे, राजू माळी, सभापती शुभांगी भोलाने, अनिल वराडे, कैलास चौधरी, भागवत टिकारे, जि.प.सदस्य वनिता गवडे, रामभाऊ पाटील, रामदास पाटील, सईद बागवान, पूरनाड सरपंच मनीषा देशमुख, लोणीसीम ता.अमळनेरच्या सरपंच अंकिता पाटील, डॉ.प्रदीप पाटील, डॉ.विक्रांत जयस्वाल, संजय कपले हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पटांगण तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल विनोद सोनवणे, दीपक साळुंके, गणेश घाटे, तुषार राणे व वाढे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी बोलताना सांगितले की, खेळ हा संघ भावनेतून खेळला जाणे आवश्यक आहे व खेळातूनच दुरावा हा दूर होतो, असे मत व्यक्त करतानाच तालुक्यात बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावा २५ रोजी आयोजित केला असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहनदेखील खडसे यांनी केले.
सूत्रसंचालन व आभार भाजपाचे तालुका सरचिटणीस संदीप देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विधानसभा युवा मोर्चाचे अध्यक्ष दत्ता पाटील, तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, मुन्ना बोंडे, मोबीन शेख, विनोद चौधरी, पवना चौधरी, राहुल पाटील, पंकज बेलदार, मुकेश घटे, कल्पेश पाटील, विशाल जाधव, धनराज जाधव, धनराज लहासे, शुभम जाधव, मिलिंद मसाने, बिट्टू देशमुख यांनी परिश्रम घेतले.




 

Web Title: CM at Muktainagar Inauguration of the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.