उमेदवारास ऑनलाइन अर्ज भरावा लागणार

By Admin | Published: January 17, 2017 01:01 AM2017-01-17T01:01:36+5:302017-01-17T01:01:36+5:30

रुबल अग्रवाल : जिल्हा परिषदेसाठी 2457 मतदान केंद्रे

Candidate will have to fill the online application | उमेदवारास ऑनलाइन अर्ज भरावा लागणार

उमेदवारास ऑनलाइन अर्ज भरावा लागणार

googlenewsNext

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत  समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. मूळ अर्जाबरोबर ऑनलाइन अर्जाची प्रतही सादर करणेही आवश्यक असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.
जिल्ह्यात जि.प. निवडणुकांसाठी  16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 27 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील पोस्टर्स, बॅनर्ससारख्या जाहिरातींद्वारे प्रचार होत असल्याचे लक्षात आल्यास कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
2457  मतदान केंद्रे
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 67 गट आहेत. या गटांसाठी मतदारांची संख्या 21 लाख 61 हजार 374 एवढी आहे. तर मतदान केंद्रांची संख्या 2457 एवढी आहे. तालुकानिहाय मतदान केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. चोपडा- 234, यावल- 160, रावेर- 203, मुक्ताईनगर 134, बोदवड- 59, भुसावळ- 114, जळगाव- 178, धरणगाव- 123, अमळनेर- 191, पारोळा- 131, एरंडोल- 99, जामनेर- 273, पाचोरा- 185, भडगाव- 117, चाळीसगाव- 256 याप्रमाणे मतदान केंद्र असतील.
प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरणेही आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाकडून राजकीय पक्षांच्या काही व्यक्तींना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तसेच सायबर कॅफेचालकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही सुविधा 24 तास सुरू असेल. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी अडीच वाजेर्पयत ऑनलाइन अर्ज भरता येतील. प्रत्येक उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रतही उमेदवारी दाखल करताना सादर करावी, अशा आयोगाच्या सूचना असल्याचेही जिल्हाधिका:यांनी सांगितले.
तक्रारीसाठी नवीन अॅप
4आचारसंहिता भंग होत असल्याबद्दलच्या तक्रारींसाठी राज्य निवडणूक आयोग नवीन मोबाइल अॅप  तयार करत असून, लवकरच त्याचा नंबरही जाहीर केला जाणार आहे. कोणताही नागरिक मोबाइलवर फोटो काढून तो या अॅपवर टाकू शकेल. याची तत्काळ दखल घेतली जाणार आहे.
राजकीय पक्षांची वर्गाकडे पाठ
4ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांची बैठक व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ऑनलाइन अर्ज कसा भरावा याची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या देणार होत्या. मात्र बैठकीच्या वेळात वा नंतरही राजकीय पक्षांचे पदाधिकारी या बैठकीस आलेच नाहीत.

Web Title: Candidate will have to fill the online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.