बाबा राम रहीमच्या समर्थकांच्या आंदोलनाचा केळी निर्यातदारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 05:46 PM2017-08-28T17:46:10+5:302017-08-28T17:53:21+5:30

पंजाब-हरियाणातील हिंसाचारामुळे जळगावातून होणारी केळीची निर्यात थांबली. ब:हाणपूर येथील केळीभावात 500 रुपयांची घसरण.

Banana exporters hit Baba Ram Rai's protest rally | बाबा राम रहीमच्या समर्थकांच्या आंदोलनाचा केळी निर्यातदारांना फटका

बाबा राम रहीमच्या समर्थकांच्या आंदोलनाचा केळी निर्यातदारांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्देब:हाणपूरच्या केळी लिलावात दररोज 300 ट्रकची आवकआंदोलनामुळे केळी भावात 500 रुपयांची घसरणकेळी निर्यात मंदावल्याने मालाच्या उठावावर परिणाम

किरण चौधरी/ऑनलाईन लोकमत 
रावेर, दि.28 - डेरा सच्चा सौदा दरबारातील रामरहीम बाबा उर्फ गुरूमीतसिंगला दोषी ठरवल्यानंतर त्याच्या अनुयायांनी पंजाबसह- हरियाणात हिंसाचार सुरु केला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून या ठिकाणी होणारी केळीची निर्यात थांबली आहे. मागणी घटल्याने ब:हाणपूर च्या केळीभावात सुमारे 400 ते 500 रू प्रतिक्विंटल फटका बसला आहे.   
हरियाणात डेरा सच्चा सौदाच्या गुरूमीतसिंग उर्फ राम रहीम बाबाला  साध्वीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यानंतर कथित अनुयायांनी हिंसाराचा कहर केला आहे. त्यात निष्पाप व निरपराध 26 जणांचा बळी घेतला. या हिंसाचारामुळे पंजाब-हरियाणा राज्यात जमावबंदीची परिस्थिती असून रहदारी ठप्प आहे. हरियाणातील पंचकुला, सिरसा, मनसेर व रोहतकसह संपुर्ण पंजाबमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे केळी निर्यातीला ब्रेक बसला आहे. वाढती मागणी असतांनाही रोजची होणारी केळी निर्यात मंदावल्याने केळीमालाच्या उठावावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. 
   दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू - काश्मीरमधील निर्यातीत अनियमितता असते. त्यातच पंजाब व हरियाणात केळी निर्यात पुर्णपणे ठप्प झाल्याने केळीमालावर मंदीचे सावट आले आहे. सुमारे दीड हजार रुपये प्रतिक्विंटल वरून एक हजार रुपये प्रतिक्विंटलर्पयत केळीभाव आले आहेत. 
मध्यप्रदेशातील ब:हाणपूरच्या केळी लिलाव बाजारात दररोज 200 ते 300 ट्रक लागत असतानाही 1500रू प्रतिक्विंटल वरून 1000 रू प्रतिक्विंटल पयर्ंत 500 रू नी केळीभाव गडगडले आहे. 
 
गुरूमीतसिंग उर्फ राम रहीम बाबा यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यानंतर  उफाळलेल्या हिंसाचारामुळे मोठा फटका बसला आहे. केळी उत्पादकांना त्याची किंमत चुकवावी लागत आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यास केळी निर्यात सुरळीत होवून भावातही सुधारणा होण्याची आशा आहे 
- रामदास पाटील, अध्यक्ष, रावेर केळी युनियन, रावेर. 

 

Web Title: Banana exporters hit Baba Ram Rai's protest rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.