भुसावळ येथे बियाणी पब्लिक स्कूलमध्ये पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:13 AM2018-12-26T01:13:02+5:302018-12-26T01:15:14+5:30

राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

Award distribution in Biyani Public School at Bhusaval | भुसावळ येथे बियाणी पब्लिक स्कूलमध्ये पारितोषिक वितरण

भुसावळ येथे बियाणी पब्लिक स्कूलमध्ये पारितोषिक वितरण

Next
ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांचा झाला गौरवकलाशिक्षकांसह पुरस्कारार्र्थींचाही सन्मानअभ्यासात योगदान देऊन नाव कमविण्याचे मान्यवरांचे आवाहन

भुसावळ, जि.जळगाव : राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल (इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम) मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रचार्य आर.आर.सहानी होते. यावेळी बियाणी एज्युकेशम ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी, राजू पारीख, प्रवीण भराडिया, डी. एम.पाटील, प्राचार्य यु.बी. निगम, सोफीया फ्राँन्सीस उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले. आर.आर.सहानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी यापेक्षा जास्त पुरस्कार मिळवून स्वत:चे व शाळेचे नाव वाढवावे. अभ्यासातपण पुढे गेले पाहिजे. मोबाइल खेळणे टाळूून अभ्यास करावा.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. सोफिया फ्रान्सिस यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमात राघूकुल एज्युकेशन ट्रस्टतर्फे शाळेला आदर्श विद्यालय पुरस्कार तसेच प्राचार्य सोफिया फ्रान्सिस यांना कलागौरव पुरस्कार तसेच कलाशिक्षक नितीन अडकमोल यांना कलाभूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दामिनी राजपूत, गायत्री आंबोडकर, प्रेरणा जैन, गायत्री चौधरी, काजल मेटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर यु.बी निगम यांनी आभार मानले.

Web Title: Award distribution in Biyani Public School at Bhusaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.