जळगाव शहरात आईचा मृत्यू झाल्यानंतरही मुलगा फिरकला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:28 AM2018-04-15T11:28:41+5:302018-04-15T11:28:41+5:30

चार दिवसापूर्वीच रायपुर (ता.जळगाव) येथे मुलासह वास्तव्याला आलेल्या मायाबाई (वय ५०) या महिलेचा शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता मृत्यू झाला. नवीन वास्तव्याला आल्यामुळे या कुटुंबाची कोणाशीही ओळख नाही. मृत्यू झाला तेव्हा मायाबाई या एकट्याच घरी होत्या. घर मालक व अन्य लोकांनी बाहेर गेलेल्या मुलाला या घटनेची माहिती दिली, परंतु शनिवारी सायंकाळपर्यंतही तो आईच्या मृतदेहाजवळ आला नाही.

After the death of mother in Jalgaon city, the child did not go | जळगाव शहरात आईचा मृत्यू झाल्यानंतरही मुलगा फिरकला नाही

जळगाव शहरात आईचा मृत्यू झाल्यानंतरही मुलगा फिरकला नाही

googlenewsNext
ठळक मुद्दे रायपूर येथील घटनाघरमालकाकडून नातेवाईकांचा शोध चार दिवसापूर्वीच आले वास्तव्याला

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१५ : चार दिवसापूर्वीच रायपुर (ता.जळगाव) येथे मुलासह वास्तव्याला आलेल्या मायाबाई (वय ५०) या महिलेचा शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता मृत्यू झाला. नवीन वास्तव्याला आल्यामुळे या कुटुंबाची कोणाशीही ओळख नाही. मृत्यू झाला तेव्हा मायाबाई या एकट्याच घरी होत्या. घर मालक व अन्य लोकांनी बाहेर गेलेल्या मुलाला या घटनेची माहिती दिली, परंतु शनिवारी सायंकाळपर्यंतही तो आईच्या मृतदेहाजवळ आला नाही.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायाबाई व त्यांचा मुलगा याच आठवड्यात रायपुर येथे वास्तव्याला आले.राजू बिसनसिंग परदेशी यांच्या मालकीच्या घरात ते भाड्याने राहू लागले. पहिल्या दिवसापासून ही महिला आजारी होती. मुलगा सेंट्रींगचे काम करतो, मात्र त्याला दारुचे व्यसन असल्याने तो कधी घरी येतो तर कधी येतही नाही. शुक्रवारी रात्री मायाबाई यांंना घरीच रक्ताची उलटी झाली. त्या बेशुध्दावस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर घर मालकाने मुलाशी संपर्क केला, मात्र तेव्हा झाला नाही. त्यामुळे या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.याबाबत एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. हेडकॉन्स्टेबल दिनकर खैरनार यांनी जिल्हा रुग्णालयात जावून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. नातेवाईकांची चौकशी केली असता फारशी माहिती मिळाली नाही.  मृतदेह जिल्हा रुग्णालयात   त्यामुळे मृतदेह शवागार गृहात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आईचा मृत्यू झाल्याबाबत घर मालक व अन्य लोकांनी मुलाला फोनद्वारे कळविले, परंतु त्याने ऐकून घेतले, परंतु रात्रीतून किंवा दुसºया दिवशीही तो रुग्णालयात किंवा घरी आला नाही. नंतर मात्र त्याच्याशीही संपर्क झाला नाही. भुसावळ येथे खडका चौक परिसरात मायाबाई यांचे जवळचे नातेवाईक राहत असल्याची माहिती मिळाली आहे. घर मालक तेथे चौकशीसाठी गेल्याची माहिती खैरनार यांनी दिली.  
 

Web Title: After the death of mother in Jalgaon city, the child did not go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.