जळगावातील गाळेधारकांच्या कारला गाडेगाव घाटात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:05 PM2017-07-30T13:05:34+5:302017-07-30T13:06:42+5:30

चार जण जखमी : कायदेशीर सल्ला घेण्यासाठी औरंगाबादला जात असताना घडली घटना

Accident in the Gadegaon Ghat in Jalgaon district | जळगावातील गाळेधारकांच्या कारला गाडेगाव घाटात अपघात

जळगावातील गाळेधारकांच्या कारला गाडेगाव घाटात अपघात

Next
ठळक मुद्दे गाळेधारकांच्या कारला समोरुन येणा:या आयशरने दिली जोरदार धडक वकिलांशी चर्चा न करताच परतले गाळेधारकएअर बॅगमुळे बचावला चालक 

ऑनलाईन लोकमत


जळगाव, दि. 30 - शहरातील 18 व्यापारी संकुलांमधील गाळे ताब्यात घेण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर वकीलांकडे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी औरंगाबाद येथे जात असताना गाळेधारकांच्या कारला समोरुन येणा:या आयशरने जोरदार धडक दिली. त्यात चार जण जखमी झाले. त्यांना तातडीने जळगावात हलविण्यात आले व खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजता गाडेगाव (ता.जामनेर) घाटात हा अपघात झाला. 
आशुतोष शेट्टी, हितेशचंद्र शहा (वय 38 रा.प्रताप नगर, जळगाव), फिरोज सलीम भिस्ती(वय 29 रा.शाहू नगर, जळगाव) व चालक अमोल नारायण मराठे (वय 28 रा.इच्छादेवी चौक, जळगाव) हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर  खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जिल्हाधिका:यांनी केली विचारपूस
या अपघाताची माहिती कोअर कमिटीच्या पदाधिका:यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना दिली. त्यावेळी जिल्हाधिकारीही नाशिकला जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी संबंधित डॉक्टरांशी उपचाराबाबत चर्चा केली तर जखमींच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिका:यांनी यावेळी दिले.
वकिलांशी चर्चा न करताच परतले गाळेधारक
अपघात झाल्याची माहिती मिळताच कोअर कमेटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, संजय पाटील, दिलीप दहाड, वसिम काझी हे औरंगाबादला पोहचलेच नाहीत. त्यामुळे वकीलांना न भेटता जळगावकडे पुन्हा रवाना झाले. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनी व महापौर नितीन लढ्ढा यांनी सायंकाळी रुग्णालयात जाऊन जखमींची आस्तेवाईकपणे चौकशी केली. 
एअर बॅगमुळे बचावला चालक 
या अपघातात अमोल मराठे हा चालक एअर बॅगमुळे बचावला आहे. एअर बॅग उघडली नसती, तर मोठी दुर्घटना घडली असती. त्याच्या छातीला व तोंडाला मार लागला आहे. त्याचेही नशिब बलवत्तर म्हणून तो वाचला. कारची स्थिती पाहता अपघात किती भीषण होता, याची जाणीव होते. दरम्यान, या अपघातील चौघांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. वेगवेगळ्या दवाखान्यात नातेवाईक व मित्र मंडळाची गर्दी झाली होती.

Web Title: Accident in the Gadegaon Ghat in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.