जिल्ह्यातील १०० ग्राम पंचायतींसाठी २६ डिसेंबरला होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 04:09 PM2017-11-26T16:09:43+5:302017-11-26T16:15:22+5:30

निवडणूक: ५ डिसेंबरपासून दाखल होणार उमेदवारी अर्ज

For the 100 gram panchayats in the district, the polling will be held on 26th December | जिल्ह्यातील १०० ग्राम पंचायतींसाठी २६ डिसेंबरला होणार मतदान

जिल्ह्यातील १०० ग्राम पंचायतींसाठी २६ डिसेंबरला होणार मतदान

Next
ठळक मुद्देराजकीय वर्चस्वासाठी धडपडजळगाव तालुक्यातील ११ ग्रा.पं.चा समावेश२७ डिसेंबर रोजी होणार मतमोजणी

जळगाव: जिल्ह्यातील १०० ग्रा.पं.च्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी २६ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार असून २७ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी राजकीय हालचालींना गती आली आहे. जळगाव तालुक्यातील ११ ग्रा.पं.चा त्यात समावेश आहे.
जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाºया आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी  १२ डिसेंबर २०१७ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत  १४  डिसेंबर  असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.  २६  डिसेंबर रोजी सकाळी ७.३०  ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. २७ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
राजकीय वर्चस्वासाठी धडपड
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रा.पं.च्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात नसतानाही ग्रा.पं.वर आपले पॅनल निवडून आल्याचा दावा करण्याची चढाओढच राजकीय पक्षांमध्ये लागली होती. या निवडणुकीतही त्याचाच प्रत्यय येणार आहे.
निवडणुक जाहीर झालेली तालुकानिहाय गावे पुढील प्रमाणे-
जळगाव (११) : पळसोद, धामणगाव, निमगाव बु., खेडी खु., डोमगाव, पाथरी, लोणवाडी बु.।।, विटनेर, बिलवाडी, सुभाषवाडी, जामोद.
धरणगाव (१३): वाकटुकी, अंजन विहिरे, खामखेडे, तरडे, सतखेडा, झुरखेडा, निमखेडा, बोरखेडा, भोद बु.।।, वराड खु.।।, बाभुळगाव, फुलपाट, टहाकळी खु.।।.
जामनेर(३): टाकळी बु.।।, नांद्रा हवेली, सवतखेडे.
एरंडोल(१): सावदा प्र.चा.
भुसावळ(३): अंजनसोंडे, फुलगाव, वेल्हाळे.
यावल(७): गाड्र्या, किनगाव खु.।।, गिरडगाव, बोराळे, साकळी, म्हैसवाडी, बोरखेडे खु.।।,
मुक्ताईनगर (४): मुक्ताईनगर, चिखली, बेलसवाडी, पिंप्रीनांदू.
रावेर (११):आभोडे, चिनावल, कळमोदे, मांगी, पातोंडी, रोझोदे, शिंगाडी, थेरोळे, उटखेडे, वाघोदे खु.।।, खिर्डी बु.।।
पाचोरा(४): गाळण खु.।।, विष्णुनगर, वडगाव आंबे बु.।।, वडगाव आंबे.
चाळीसगाव (८): दहिवद, चिंचगव्हाण, वडाळे-वडाळी, पातोंडा, ओझर, माळशेवगे, पिंप्री बु.प्र.चा., तळेगाव.
भडगाव (५): लोण प्र.ऊ., पासर्डी, भातखंडे बु.।।, अंजनविहिरे, गुढे.
अमळनेर (६): शिरसाळे बु.।।, पिंपळे खु.।।, सडावण बु., रढावण, नंदगाव, मठगव्हाण.
पारोळा(११): खेडी ढोक, वाघरे, पोपटनगर, भोंडणदिगर, उंडणीदिगर, खोलसर, चहुत्रे, शेवगे प्र.ब., मोंढाळे प्र.ऊ., दगडी सबगव्हाण, मोहाडी.
चोपडा(१३): लासुर, गणपूर, विष्णापूर, वडती, वराड, आडगाव, मालखेडे, अनवर्दे खु., तावसे, पारगाव, सुटकार, वडगांव बु.।।, धुपे बु.।।

Web Title: For the 100 gram panchayats in the district, the polling will be held on 26th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.