अज्ञात माथेफिरूने पाच वाहने जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:06 AM2018-09-26T01:06:35+5:302018-09-26T01:07:40+5:30

मंठा चौफुलीजवळील शकुंतला नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री कोणी तरी परिसरात उभ्या असलेल्या दोन कार आणि तीन दुचाकी जाळल्याने खळबळ उडाली

The unknown psychopath burned five vehicles | अज्ञात माथेफिरूने पाच वाहने जाळली

अज्ञात माथेफिरूने पाच वाहने जाळली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील मंठा चौफुलीजवळील शकुंतला नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री कोणी तरी परिसरात उभ्या असलेल्या दोन कार आणि तीन दुचाकी जाळल्याने खळबळ उडाली आहे. नेमक्या कोणत्या कारणावरून हे कृत्य केले याचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
मंठा चौफुली येथील शकुंतलानगरमधील रहिवासी बाबूराव नरसिंग राठोड यांनी या संदर्भात तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, स्विफ्ट कार (एमएच २१, एजे २५५५), दुचाकी होंडा शाईन (एमएच २१, बीसी २५५५) तसेच अ‍ॅक्टिव्हा (एमएच २१, बीसी ४७४५), अल्टो कार (एमएच २१, एएक्स ०६५९) आणि दुचाकी (एमएच ४६, ६८७८) या गाड्या जाळण्यात आल्या. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नेमक्या गाड्या कोणी आणि कुठल्या कारणास्तव जाळल्या, याचा खुलासा झालेला नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान आग विझविण्यासाठी रात्री परिसरातील नागरिकांनी मदत केली.

Web Title: The unknown psychopath burned five vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.