निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जागते रहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:09 AM2019-03-27T00:09:50+5:302019-03-27T00:10:04+5:30

लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्ववैमनस्यातून आॅनर किलिंगच्या घटना जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, यात हलगर्जीपणा करु नये असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.

Stay awake to carry out the elections in peace | निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जागते रहो

निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जागते रहो

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्ववैमनस्यातून आॅनर किलिंगच्या घटना जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, यात हलगर्जीपणा करु नये असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंघल यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांची आढावा बैठक घेतली.
यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, चंपालाल शेवगण, सुनील जायभाये, सोपान बांगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील अठरा पोलीस ठाणे प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
औरंगाबाद परिक्षेत्रात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच रवींद्र सिंघल यांनी जालना येथे पोलिसांची आढावा बैठक घेतली.
निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही जण जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्थेचा बिघडविण्याचा प्रयत्न करण्याची भीती असते.
यामुळे पोलिसांनी अशा गुंडावर नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, बेकायदेशीर शस्त्र, दारुविक्री करणाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी पोलीस प्रमुखांना दिल्या.
तसेच निवडणूक काळात कोणत्या गोष्टीना पहिले प्राधान्य द्यावे याविषयी सिंघल यांनी सांगितले. बीड येथे पूर्ववैमनस्यातून एका पक्षाच्या नगरसेवकाचा खून करण्यात आला आहे.
अशा घटना जिल्ह्यात घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आदेश यावेळी सिंघल यांनी दिले.

पोलिसांचे कौतुक
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि एडीएसच्या पथकाने जुगाराचे अड्डे, दारु अड्ड्यांवर छापे मारुन अनेकांवर कारवाई केली. तिघा जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन हर्सूल कारागृहात रवानगी केली. तसेच दोघा जणांवर हद्दपारीची कारवाई केल्याने सिंघल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे यावेळी कौतुक केले.
जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून कुठलीच विपरीत घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विपरीत घटना घडण्याची दाट शक्यता असते, यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश यावेळी सिंघल यांनी दिले.

Web Title: Stay awake to carry out the elections in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.