नगरपालिका पदभरती परीक्षेत बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:48 AM2017-08-16T04:48:04+5:302017-08-16T04:48:04+5:30

नगर परिषद पदभरती परीक्षेत शर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करून पेपर सोडविणाºया सात परीक्षार्थींना पोलिसांनी रविवारी अटक केली.

Sprawling in the municipal post-mortem examination | नगरपालिका पदभरती परीक्षेत बनवाबनवी

नगरपालिका पदभरती परीक्षेत बनवाबनवी

Next

जालना : नगर परिषद पदभरती परीक्षेत शर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करून पेपर सोडविणाºया सात परीक्षार्थींना पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक अल्पवयीन आहे.
कृष्णा साहेबराव भवर (२१), कृष्णा रमेश दांडगे (२७), नलालसिंग महाजनसिंग सुंदर्डे, प्रदीप बदामसिंग सुलाने, प्रदीप हरिओम गुसिंगे, विक्रम धरमसिंग जारवाल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जालना, परतूर, अंबड आणि भोकरदन नगर परिषदेच्या लिपिक टंकलेखक, फायरॅन, तारतंत्री, उद्यान सहायक, पंपचालक, वाहनचालक, प्रयोगशाळा सहायकपदांच्या ३३ जागांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी ११ केंद्रांवर सकाळी परीक्षा झाली.
पेपर सुरू झाल्यावर काही वेळात जेईएस महाविद्यालयातील केंद्रावर आलेल्या नायब तहसीलदारांच्या भरारी पथकाने परीक्षार्थींची झडती घेतली असता, त्यांना या परीक्षार्थींकडे मोबाइलसदृश्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सापडले.
पथकाने पोलिसांच्या मदतीने परीक्षार्थींना सदर बाजार पोलीस ठाण्यात आणले. विक्रम धरमसिंग जारवाल याचे हॉलतिकीट तपासले असता तो दुसºयाच्या नावाने परीक्षा देत असल्याचे समोर आले.
>शर्टमध्ये बसवले डिव्हाईस
या परीक्षार्थींनी शर्टमध्ये अत्यंत चालाखीने इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसविले होते. त्यातून पेपर स्कॅन होऊन केंद्राबाहेर जात होता. पकडण्यात आलेले सर्व परीक्षार्थी लिपिकपदासाठी अर्ज केलेले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परीक्षेत असा प्रकार समोर आला होता. यात मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे.
- शिवाजीराव जोेंधळे, जिल्हाधिकारी, जालना

Web Title: Sprawling in the municipal post-mortem examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.