चांगल्या पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:44 AM2019-08-13T00:44:46+5:302019-08-13T00:44:53+5:30

चांगले पर्जन्यमान व्हावे, यासाठी बकरी ईदनिमित्त आयोजित सामूहिक नमाज कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी विशेष प्रर्थना केली.

Muslim Brothers Pray for Good Rain | चांगल्या पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

चांगल्या पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या आठवडाभरापासून गायब असलेल्या पावसाने सर्वजण हवालदिल झाले आहेत. त्यामुळे चांगले पर्जन्यमान व्हावे, यासाठी बकरी ईदनिमित्त आयोजित सामूहिक नमाज कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी विशेष प्रर्थना केली.
शहरातील जुना जालना, गांधी नगर, सदरबाजार ईदगाह मध्ये बकरी ईदनिमित्त सोमवारी सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाज अदा केल्यानंतर वरील तिन्ही ठिकाणी चांगला पाऊस पडावा म्हणून प्रार्थना करण्यात आली. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात महापुरामुळे जी जीवित हानी झाली, त्यातील मृतांना श्रध्दांजलीही वाहण्यात आली.
बकरी ईदनिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी इक्बाल पाशा, शहाआलम खान, माजी नगरसेवक नूर खान, अकबर खान यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. शहरासह जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त पोलिसांनी देखील वाहतूक व्यवस्थेत बदल करून चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: Muslim Brothers Pray for Good Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.